वरदा मुळ्ये आदर्श विद्यार्थिनी

वरदा मुळ्ये आदर्श विद्यार्थिनी

Published on

-rat८p१.jpg-
२५N८२९६४
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आदर्श विद्यार्थिनी पारितोषिक वरदा मुळ्ये हिला प्रदान करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर. शेजारी मान्यवर.
----
वरदा मुळ्येला आदर्श विद्यार्थिनी पारितोषिक
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय; टिळक पारितोषिकांचेही वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात विविध पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये वरदा मुळये हिला (कै.) उन्मेष घाटे आदर्श विद्यार्थी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, वक्ते गजानन पळसुलेदेसाई आणि डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. महाविद्यालयातील गुणी, हुशार, अभ्यास आणि अभ्यासेत्तर उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस आदर्श विद्यार्थी पारितोषिक दिले जाते. वरदा हिने भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची इन्स्पायर शिष्यवृत्ती प्राप्त केली. याच विभागाने रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी, पुणे येथे आयोजित केलेल्या शिबिरासाठी तिची निवड झाली तसेच आयआयटी मद्रास संशोधन शिष्यवृत्ती २०२५ साठी देशभरातून निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तिची निवड झाली. यात तिला १५ हजार रुपये शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल तिला हे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
(कै.) प्रभाकर करमरकर गणित पारितोषिक गणित विषयातील प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील प्रथम प्रणव कदम याला दिले. द्वितीय व तृतीय वर्षासाठी शिवम कीर या विद्यार्थ्यास प्रदान केले. लोकमान्य टिळक पारितोषिक आणि गणित/ संस्कृत विभागाने दिलेले पारितोषिक बारावीमध्ये गणित, संस्कृत विषय घेऊन प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास दिले जाते. यावर्षी गणित विषयासाठी हे पारितोषिक अनम नाईक याला गौरवण्यात आले. (कै.) गणेशशास्त्री घाटे पारितोषिक आणि मराठी विभागाने दिलेले पारितोषिक द्वितीय वर्ष कला शाखेत मराठी विषयात प्रथम आलेल्या गौरी कीर हिला देण्यात आले.

चौकट १
वक्तृत्व स्पर्धेचा निकाल
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थी जान्हवी जोशी (प्रथम क्रमांक), रिझा हरचिरकर (द्वितीय क्रमांक), रूहिना राजवाडकर (तृतीय क्रमांक) आणि ओंकार आठवले (उत्तेजनार्थ) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com