मूर्ती शाळांमध्ये साकारू लागले गणपती बाप्पा
लोगो ः येई गणेशा
---
83021
83019
मूर्ती शाळांमध्ये साकारू लागले गणपती बाप्पा
गणेशोत्सवाची चाहूल; कलाकारांची धडपड जोमात, रात्रंदिवस काम
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ८ ः गणेशोत्सव जवळ येतोय तशी मूर्ती कार्यशाळांमधील लगबग वाढली आहे. येथे काम पूर्ण करण्यासाठी दिवसाबरोबरच रात्रीही जागू लागल्या आहेत. वाडीवाडीतील घरे, रस्त्यांच्या स्वच्छता कामांना सुरुवात झाली आहे. गणेशाच्या आगमनाची सर्वांनाच चाहूल लागली असून, गणेशमूर्ती शाळांमध्ये आता हातघाई सुरू झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
कोकणात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. चालूवर्षी गणेश चतुर्थी २७ ऑगस्टला असून, त्याअनुषंगाने गणेशमूर्ती शाळेत मूर्ती कलाकार पारंपरिक पद्धतीने मातीच्या तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार ‘पीओपी’ व शाडू मातीच्या मूर्ती घडविण्यात व्यस्त आहेत. बाप्पाच्या आगमनाला मोजकेच दिवस राहिल्याने कलाकारांकडून गणेश मूर्तींचे अंतिम टप्प्यातील कामाची लगबग सुरू आहे. त्यांच्या या कामात छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत तसेच युवा पिढीही सक्रिय होत काम करत आहे.
---
उत्सवात महागाईची झळ शक्य
दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे माती, रंग, कामगारांचे वेतन यांचा ताळमेळ साधताना या कलाकारांना मोठी कसरत करावी लागत आहे. महागाई वाढल्यामुळे साहजीकच याचा फटका ग्राहकांनासुद्धा बसणार आहे. सध्या परगावी असणारे चाकरमानी, गणेशभक्त कोकणात आपल्या गावी दाखल होऊ लागले आहेत.
--
घरोघरी रंगरंगोटी, बाजापेठाही सजल्या
गणपती बाप्पाचा सण मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करण्यासाठी गणेशभक्तांकडून नियोजन सुरू आहे. घराची साफसफाई, रंगरंगोटी, सजावट करण्यात व्यस्त आहेत. बाजापेठासुद्धा या सणासाठी लागणाऱ्या साहित्याने फुलल्या आहेत. बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मूर्ती शाळांमध्ये रात्री जागवू लागल्या आहेत. त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे कलाकारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.