-भाट्येत शाश्वत शेती दिनी शेतकऱ्यांचा गौरव
rat८p६.jgp-
२५N८२९७४
रत्नागिरी ः भाट्ये येथे शेतकऱ्याचा सत्कार करताना जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले.
----
भाट्येत शाश्वत शेतीदिनी शेतकऱ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ८ ः भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि सुरक्षेचे आधारस्तंभ भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रात शाश्वत शेतीदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, प्रकल्प संचालक (आत्मा) विजय बेतीवार, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे, कृषी संशोधन केंद्र शिरगावचे प्रभारी अधिकारी डॉ. एन. जी. सोनोने, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, शेतकरी हेमंत फाटक आदी उपस्थित होते.
डॉ. मालशे यांनी संशोधन व तंत्रज्ञानाचा शाश्वत वापर, शेतीमधील निविष्ठांचा वापर, कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा वापर, कृषिपूरक व्यवसाय, पणन व मूल्यवर्धन याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सोनवणे यांनी अन्नसुरक्षेबाबत माहिती दिली. या प्रसंगी सदाफुले म्हणाले, कालानुरूप शेतीचे स्वरूप बदलले आहे. यापूर्वी अन्नसुरक्षा महत्त्वाची होती; परंतु आता अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्यानंतर आता पौष्टिकता महत्त्वाची आहे. यासाठी वरिष्ठ स्तरावरून पौष्टिक तृणधान्य वर्षासारखे कार्यक्रम साजरे केले जातात. २०२४ मध्ये संशोधन केंद्रामार्फत घेतलेल्या बीजोत्पादन कार्यक्रमांमधून उत्कृष्ट परतावा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार सदाफुले यांच्या हस्ते करण्यात आला.