राजापूर-मक्याची सालीपासून बनवल्या इकोफ्रेंडली राख्या

राजापूर-मक्याची सालीपासून बनवल्या इकोफ्रेंडली राख्या

Published on

83004
83005
83006

काही सुखद--लोगो

मक्याच्या सालापासून बनवल्या इकोफ्रेंडली राख्या
आरएसपीएम स्कूलचा उपक्रम; दोऱ्यासाठी केला हसोळ फळाच्या सालीचा वापर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ः राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आरएसपीएम स्कूल, राजापूरच्या विद्यार्थ्यांनी मक्याचे दाणे काढून झाल्यावर टाकून देण्यात येणारी हिरवी साल आणि ‘हसोळं’ या रानमेव्याचा खुबीने उपयोग करून आकर्षक अशा ‘पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली’ राख्या बनवल्या आहेत. विविध कारणांमुळे पर्यावरणाच्या ढासळणाऱ्या समतोलाबाबत चिंता व्यक्त केली जात असताना बहीण-भावाच्या अतूट नात्याची वीण अधिक घट्ट करणाऱ्या पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली राख्यांचे कौतुक होत आहे.
शहरातील आरएसपीएम स्कूल, राजापूरमध्ये मुलांना पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रम शिकवताना त्याच्या जोडीला विद्यार्थ्यांचा विविध कौशल्ययुक्त व्यक्तीमत्व विकास व्हावा, या उद्देशाने अन्य विविध नावीन्यपूर्ण उपक्रमही राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक नीलेश पवार आणि सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गामध्ये सहजपणे मुबलक प्रमाणात मिळणार्‍या वस्तूंचा उपयोग करत पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली राख्या तयार केल्या आहेत.
मक्याच्या कणसातील दाणे काढल्यावर हिरवी साल फेकून दिली जाते. फेकून देण्यात येणाऱ्या मक्याच्या कणसाच्या या सालीचा उपयोग करत विद्यार्थ्यांनी विविध आकाराच्या आकर्षक पाकळ्या तयार केल्या. त्या पाकळ्या एकमेकांना जोडून पर्यावरणपूरक राखी तयार केली. ही राखी हाताला बांधण्यासाठी आवश्यक असलेला दोरा रानमेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हसोळं या फळाच्या सालीच्या साह्याने तयार केला आहे.

चौकट
शाळेत साजरा केला सण
वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोख्या अशा पर्यावरणपूरक तब्बल ४० राख्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या. त्या राख्यांचा उपयोग करत प्रशालेमध्ये रक्षाबंधन सण विद्यार्थ्यांनी साजरा केला. राखी हाताला बांधण्यासाठी दोऱ्याची आवश्यकता असतो. हा दोरा जंगलामध्ये मुबलक प्रमाणात मिळणार्‍या रानमेव्यांतील ‘हसोळं’ या फळाच्या झाडाच्या सालीच्या साह्याने तयार करण्यात आला. या राखीला अधिक आकर्षकता यावी म्हणून मण्यांचाही त्यामध्ये वापर करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक नीलेश पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com