कलामार्गदर्शनासाठी विलास रहाटे सन्मानित

कलामार्गदर्शनासाठी विलास रहाटे सन्मानित

Published on

कला मार्गदर्शनासाठी विलास रहाटे सन्मानित
साडवली ः मुंबई विद्यापीठाचा ५७वा आंतरमहाविद्यालय युवा महोत्सवाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच झाला. देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार व मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघातील फाईन आर्ट कलाप्रकारांचे मार्गदर्शक विलास रहाटे यांना डॉ. ममता अग्रवाल यांनी सन्मानित केले. रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रधनुष्य महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सव, पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सव आणि राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात फाईन आर्टमध्ये मिळालेल्या यशाची दखल मुंबई विद्यापिठाने घेतली. मुंबई विद्यापीठाच्या या विशेष पारितोषिक वितरण समारंभाला सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे, प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. ममता रानी अग्रवाल, प्राचार्य अजय भामरे आदी उपस्थित होते.

खेड शिक्षकसंघातर्फे विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव
खेड ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकसंघाच्या तालुका शाखेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा झाला. सोहळ्यात सेवानिवृत्त शिक्षक, विविध पुरस्कारप्राप्त शिक्षक, आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, नासा-इस्रो निवड चाचणी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, शिष्यवृत्तिधारक विद्यार्थी, प्राथमिक शिक्षकांचे गुणवत्ताधारक पाल्य, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी, गुणवत्ताधारक शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. पीएचडी पदवीप्राप्त प्रियांका सवाईराम यांनाही गौरवण्यात आले. या वेळी शिक्षकसंघाचे राज्य उपाध्यक्ष कृष्णकांत जंगम, शिक्षकसंघाचे जिल्हा सचिव दीपक मोने, शिक्षक पतपेढीचे संचालक राजेंद्र चांदीवडे आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com