रत्नागिरी न्यायालयात म्युरल दृष्टिक्षेपात

रत्नागिरी न्यायालयात म्युरल दृष्टिक्षेपात

Published on

-rat८p२६.jpg-
२५N८३०५४
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांना पुस्तक भेट देताना रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे.
-----
न्यायालयात डॉ. आंबेडकर यांचे म्युरल
मुख्य न्यायमूर्ती गवई सकारात्मक ; अॅड. पाटणेंनी घेतली भेट

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : रत्नागिरी न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्युरल बनवण्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
रत्नागिरीतील न्यायालयात भारतरत्न, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्युरल व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे शिवाय डॉ. बाबासाहेबांनी येथे खटलाही चालवला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांचे म्युरल लवकर पूर्णत्वास जावो, अशी आग्रहाची मागणी रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांना प्रत्यक्ष भेटून केली. त्या वेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती अॅड. पाटणे यांनी दिली.
या भेटीबाबत अॅड. पाटणे म्हणाले, न्यायमूर्ती गवई हे कोल्हापूर सर्किट बेंचचे शिल्पकार म्हणावे लागतील. त्यांनी कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना करून सहा जिल्ह्यातील वकील, पक्षकारांना न्याय दिला आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटून कृती समितीतर्फे आभार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी न्यायालयाच्या इमारतीचे उद्‍घाटन १६ ऑगस्ट रोजी व सर्किट बेंचचे १७ ऑगस्ट रोजी होईल, असे त्यांनी सांगितले आहे. न्यायमूर्ती गवई हे १४ मेपासून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले आहेत. राज्यघटनेचे कलम ३७० रद्द करणे, इलेक्ट्रोल बाँड, भाषण स्वातंत्र्य आदी महत्त्वाचे निकाल त्यांनी दिले.

Marathi News Esakal
www.esakal.com