ज्या शाळेत शिकल्या, त्याच शाळेत झाल्या मुख्याध्यापिका

ज्या शाळेत शिकल्या, त्याच शाळेत झाल्या मुख्याध्यापिका

Published on

-rat८p२५.jpg-
२५N८३०५३
रत्नागिरी : अ. के. देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली पिलणकर.
-----------
शिक्षण घेतलेल्या शाळेतच मुख्याध्यापिका
अंजली पिलणकर ; २७ वर्षे इंग्रजी अध्यापन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : ज्या शाळेत शिकल्या त्यातच शाळेत मुख्याध्यापिका होण्याचा मान अंजली पिलणकर यांनी पटकावला आहे. मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी त्यांची नुकतीच नियुक्ती झाली. त्या विद्यार्थिप्रिय इंग्रजी विषयाच्या शिक्षिका आहेत.
पिलणकर यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला या निमित्त शाळेत छोटेखानी स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी त्यांचे स्वागत केले.
पिलणकर यांचा इंग्रजी विषयाचा अध्यापन अनुभव २७ वर्षे आहे. त्यांनी तालुका, जिल्हा व विभागस्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. विविध उपक्रम व शिबिरे आयोजित करून एसएससी बोर्डाचा इंग्रजी विषयाचा १०० टक्के निकाल लागण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांना जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचा आदर्श महाराष्ट्र छात्र सेना शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट मुंबई यांचा राज्य उत्कृष्ट गाईडर पुरस्कार जाहीर, लायन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार व रोटरी क्लब रत्नागिरी यांचा नेशन बिल्डर पुरस्कार मिळाला आहे. मराठा मंदिर संस्थेचे सर्व उपाध्यक्ष विलासराव देशमुख, विद्यावर्धिनीचे अध्यक्ष योगेश पवार, सचिव मनोहर साळवी, उपाध्यक्ष संतोष नलावडे आदींनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Marathi News Esakal
www.esakal.com