-उपविभागातर्फे उत्कृष्ट महसूल कर्मचार्यांचा सत्कार
-rat८p३०.jpg-
P२५N८३११७
रत्नागिरी : नायब तहसीलदार श्रुती सावंत यांचा सत्कार करताना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जीवन देसाई व अन्य अधिकारी.
------
उत्कृष्ट महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार
रत्नागिरी उपविभागातर्फे आयोजन ; महसूल दिनाचे औचित्य
रत्नागिरी, ता. ८ : महसूल दिनानिमित्त रत्नागिरी उपविभागीय कार्यालयाच्यावतीने रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, निवडणूक निर्णय अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, संगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे आदी अधिकारी उपस्थित होते. सर्वसामान्य जनतेशी थेट संबंध असलेला हा विभाग असून, तळागाळातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल अशी कामे कर्मचाऱ्यांनी करावीत, असे मत या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त करताना सर्वच कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
या वेळी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नायब तहसीलदार श्रुती सावंत, माधवी कांबळे, रिद्धी गोरे, सुदेश गोताड, मिलिंद सावंतदेसाई, साहाय्यक महसूल अधिकारी राजन गमरे, मनुश्री जोशी, रसिका खेडेकर, महेश आठल्ये, शुभांगी पाटील, मंडळ अधिकारी सुनील कीर, प्रतापसिंह पोले, अमर चाळके, उद्धव माने, महसूल साहाय्यक संजीवनी गोरे, रविकांत खाके, पल्लवी शेवाळे, विकास चव्हाण, प्रीती पाटील, पवन राठोड, ग्राममहसूल अधिकारी विश्वंभर मुरकुटे, सौरभ जाधव, सचिन पाटील आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.