कुडाळ येथे ८९ विशेष विद्यार्थ्यांची चिकित्सा
83237
विशेष ८९ विद्यार्थ्यांची
कुडाळ येथे चिकित्सा
पंचायत समितीचा पुढाकारः शिक्षकांकडून पालकांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ः राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘अखिल भारतीय शिक्षा समागम २०२५’ अंतर्गत तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला. पंचायत समिती, शिक्षण विभाग कुडाळ आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ग्रामीण रुग्णालय (कुडाळ) यांच्यावतीने विशेष गरजा असणाऱ्या तालुक्यातील एकूण ८९ विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
हे शिबिर ३० व ३१ जुलै, ५ व ६ ऑगस्ट असे चार दिवस घेण्यात आले. यात तालुकास्तरीय वाचा भाषा सुधार थेरपी, फिजिओथेरपी, दृष्टीदोष, अस्थिव्यंग आणि कान, नाक, घसा तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा मुख्य उद्देश तालुक्यातील दृष्टीदोष, कर्णदोष, अस्थिव्यंग किंवा वातदोष असलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व उपचार उपलब्ध करून देणे हा होता. या तपासणी शिबिरात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. शिक्षण विभागातील विशेष शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शैक्षणिक मदत कशी करता येईल, याबाबत पालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, विशेषतज्ज्ञ अर्पिता परब, श्वेता जगताप, विशेष शिक्षक ममता पारकर, रिया गुरव, जालिंदर कदम, मनीषा परब, नितीन गिड्डे व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच ग्रामीण रुग्णालय टिममध्ये डॉ. मुग्धा दुधगावकर, डॉ. अमोल दुधगावकर, डॉ. मीनाक्षी गंगावणे, नेत्रतज्ज्ञ डॉ. सिद्धी सामंत, डॉ. संतोष सावंत, कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. श्याम राणे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. निखिल अवधूत आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये एकूण ८९ विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या तपासणीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विशेष शिक्षण पद्धतीची शिफारस करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.