खेडमधील शवदहिनीचे काम अर्धवटच

खेडमधील शवदहिनीचे काम अर्धवटच

Published on

-rat९p२१.jpg-
२५N८३२५३
खेड ः अर्धवट स्थितीत उभारण्यात आलेली शवदाहिनी.
-rat९p२०.jpg-
२५N८३२५२
खेड ः पालिकेच्या स्मशानभूमीवरील पत्र्यांचीही दुरवस्था झाली आहे.
-----
खेडमधील शवदाहिनीचे काम अद्याप अपूर्णच
पालिकेचे दुर्लक्ष; ठेकेदार पळाला, साहित्याचीही चोरी, १४ लाखांचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ९ : शहरातील जगबुडीनदीशेजारी असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये लाकडांचा होणारा अपूर्ण पुरवठा तसेच मृतदेहाचे त्वरित विघटन होऊन पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या शवदाहिनीचे काम गेली तीन वर्षे अर्धवटच आहे.
खेड पालिकेने शासनाच्या निधीतून जगबुडीनदीशेजारी असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये १४ लाख रुपये खर्चाची डिझेलवर चालणारी शवदाहिनी बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. २०२२ ला शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर गुजरात येथील अल्फा इक्विपमेंट्स या कंपनीला शवदाहिनीचे काम दिले; मात्र हे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. याचाच फायदा घेत चोरट्यांनी या शवदाहिनीवर डल्ला मारून आतील मशिनरी, पाण्याच्या टाक्या, एक ट्रक लाकडे, ट्रे आणि गेट अशा लोखंडी साहित्याची चोरी केली. याची फिर्याद खेड पोलिस ठाण्यात देण्यात आली होती; मात्र त्याचा सुगावा लागलेला नाही.
या चोरीच्या घटनेनंतर ठेकेदार काम अर्धवट टाकून निघून गेला आहे. चोरीच्या घटनेनंतर जाग आलेल्या पालिकेने तिन्ही स्मशानभूमीत देखभाल दुरुस्तीसाठी कामगार कामावर ठेवले आहेत. कर्मचारी हे दिवसभर येथे असले तरी चोरी रात्री होते. याचाबाबीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून या ठिकाणी त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---
कोट
पालिकेने नागरिकांना बसण्यासाठी असलेल्या मंडपात शवदाहिनी बांधली आहे; मात्र गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ही शवदाहिनी अपूर्णावस्थेत आहे. पालिकेने ठेकेदाराकडून काम पूर्ण घेऊनच बिल अदा करावे.
- अमर देवळेकर, खेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com