क्राइम

क्राइम

Published on

संशयास्पद हलचाली
करणाऱ्यावर कारवाई
रत्नागिरी ः शहरातील एका फर्निचर दुकानाच्या आडोशाला स्वतःचे अस्तित्व लपवत हत्यार बाळगणाऱ्‍या संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. कमलेश कुमार थापा (रा. नेपाळ) असे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार अमित पालवे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुरूवारी रात्री संशयित हा अंधाराचा फायदा घेत आपल्या ताब्यात हत्यार बाळगून गुन्हा करण्याच्या इराद्याने लपून बसलेला पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्याच्या विरोधात सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली आहे.

वाहतुकीला अडथळा
करणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद-खंडाळा बाजारपेठेत सार्वजनिक ठिकाणी इतर वाहनांना वाहतुकीस अडथळा होईल, अशा रितीने वाहन लावल्याप्रकरणी एकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. ८) दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. दिवेश दीपक शिंदे (वय २४, रा. कळझोंडी शिंदेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार मंदार मोहिते यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी दुपारी त्याने मोटार वाटद खंडाळा येथील बाजारपेठेत सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवली हेाती. त्यामुळे इतर वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण झाला होता म्हणून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


समुद्रात पडून
प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील काळबादेवी जेटीजवळ बोटीवरून मच्छीमारी करत असताना तोल जाऊन समुद्रात पडलेल्या प्रौढाचा बुडून मुत्यू झाला. त्यांचा मृतदेह तेथील समुद्रात मिळून आला. ही घटना शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उघड झाली. गजानन महादेव पेडणेकर (वय ४५, रा. नेवरे काजिरभाटी, रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. गजानन पेडणेकर हे गुरूवारी ७ ऑगस्टला काळबादेवी येथील जेटीजवळ बोटीवरून मासेमारी करत असताना त्यांचा तोल गेला. समुद्रात पडून ते बेपत्ता झाले होते. याबाबत समीर अशोक शेट्ये (रा. काळबादेवी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली होती. दरम्यान, काळबादेवी गावातील ग्रामस्थांना तेथील समुद्रकिनारी त्यांचा शोध घेत असताना काल सायंकाळी ४ वाजता त्यांचा मृतदेह मिळून आला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com