मालवणात २० ला धार्मिक कार्यक्रम
मालवणात २० ला
धार्मिक कार्यक्रम
मालवणः श्री संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मालवण तालुका नाभिक संघटनेच्या वतीने २० ऑगस्टला मालवण येथील भैरवी मंदिर संतसेना मार्ग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता श्री संतसेना महाराज प्रतिमेचे पूजन, १० वाजता आरती व तीर्थप्रसाद, १०.१५ वाजता कीर्तन, दुपारी १२ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, १.३० वाजता स्नेहभोजन, ३.३० वाजता बालगोपाळ मंडळ आचरा यांचे भजन, रात्री ८ वाजता सुप्रसिद्ध बुवांचे भजन होणार आहे.
.....................
स्वातंत्र्य दिनानिमित्त
जादा बसचे नियोजन
कणकवलीः ७९ व्या स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त शुक्रवारी (ता. १५) ओरोस मुख्यालय येथे राष्ट्रीय परिवहन सिंधुदुर्ग विभागातून बसेस सोडण्यात येणार आहेत. या बसेस सकाळी ७.४५ वाजेपर्यंत सिंधुदुर्गनगरी येथे पोहोचतील, अशा वेळेत सोडण्यात येणार आहेत. या अनुषंगाने कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, कणकवली, मालवण आगारातील संबंधित आगारांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व बस स्थानकांवर बसगाड्यांचे वेळापत्रक प्रवाशांच्या निदर्शनास येईल, असे लावण्यात यावे. तसेच बस स्थानकावरील ध्वनिक्षेपकावरून सुटणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांबाबत उद्घोषणा करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे विभाग नियंत्रकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
....................
निवृत्त कर्मचाऱ्यांची
१९ ला मासिक सभा
सावंतवाडीः सावंतवाडी-दोडामार्ग तालुका कर्मचारी सेवानिवृत्ती संघाची मासिक सभा १९ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता संघटनेच्या सालईवाडा सावंतवाडी येथील सद्गुरू अपार्टमेंट येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या सभेस सर्व सदस्य, संचालक मंडळ, कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव संभाजी कांबळे व अध्यक्ष लक्ष्मीकांत पणदूरकर यांनी केले आहे.
......................
चित्रकला शिबिरासाठी
अरदकर यांची निवड
सिंधुदुर्गनगरीः राज्यभरातून चित्रकलेच्या क्षेत्रात वेगळे प्रयोग करणार्या चित्रकारांसाठी चिपळूण येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ‘कला-पुष्कर-राज रंगरेखा’ विशेष चित्रकला शिबिरासाठी टोपीवाला हायस्कूल, मालवणच्या कला शिक्षिका राखी अरदकर यांची निवड केली आहे. राज्यभरातून चित्रकलेच्या क्षेत्रात वेगळे प्रयोग करणार्या चित्रकारांसाठी या शिबिराचे आयोजन संस्थेमार्फत केले आहे. शिबिरासाठी येथे जलरंग, अॅक्रेलिक रंग, कॅनव्हास, हँडमेड पेपरवर काम करण्याची संधी मिळणार असून शिबिरात तयार होणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन पुढे मुंबईतील पु. ल. देशपांडे कला दालनात होणार आहे. राखी हुन्नरे उर्फ राखी अरदकर टोपीवाला हायस्कूल मालवण येथे कलाशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अनेक चित्रप्रदर्शनांमध्ये त्यांना पारितोषिके मिळाली असून नामवंत अशा कला दालनांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही आतापर्यंत अनेकवेळा भरली आहेत. त्यांच्या निवडीबाबत सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
.......................
हुतात्मा कर्णिक यांना
करूळ येथे अभिवादन
कणकवलीः करूळ येथील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या हुतात्मा स्मारकाला काल (ता. ९) क्रांती दिनी पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. कणकवली नायब तहसीलदार विजय वरक यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहण्यात आले. वैभववाडी नायब तहसीलदार दिलीप पाटील, करूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. नारकर, गणेश जेठे, करूळ हायस्कूलचे विश्वस्त भास्कर सावंत, मंडल अधिकारी श्री. मोंडे, तलाठी समृद्धी गवस, कोतवाल दिलीप कदम उपस्थित होते. सुरुवातीला स्मारकाच्या स्तंभाला पुष्पचक्र वाहण्यात आले. त्यानंतर अभिवादन सभा घेण्यात आली. विजय वरक, दिलीप पाटील यांनी हुतात्म्यांचे बलिदान कायम लक्षात ठेवून देशाची सेवा करा, असे आवाहन केले. गणेश जेठे यांनी प्रत्येक नागरिकाने देशभक्ती करावी, असे सांगितले. सूत्रसंचालन सिद्धेश खटावकर यांनी केले. शाळेतल्या मुलींनी देशभक्तिपर गीते सादर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.