खासगी आरामबसला पार्किंग, विक्रेत्यांच्या जागा निश्चित
-rat१०p३८.jpg-
P२५N८३४९९
लांजा ः तहसील कार्यालयातील बैठकीला उपस्थित व्यापारी, नागरिक, रिक्षा व्यावसायिकांना माहिती देताना तहसीलदार प्रियांका ढोले, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे.
-----
बस पार्किंगसह विक्रेत्यांची जागा निश्चित
लांजा तहसीलमध्ये बैठक : गणेशोत्सवाबाबत नियोजन बैठक
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १० ः गणेशोत्सव काळात खासगी आरामबससाठी पार्किंग आणि किरकोळ विक्रेत्यांना जागा निश्चित करून देण्याच्या सूचना तहसीलदार प्रियांका ढोले यांनी दिल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शांतता, सुरक्षितता आणि सुरळीत सेवा प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने लांजा तालुका प्रशासनाची बैठक तहसील कार्यालयात झाली.
तहसीलदार प्रियांका ढोले, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी बैठकीत नियोजनाबाबत माहिती दिली. गणेशोत्सव सुरू होणार असून उत्सव काळात प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांमध्ये समन्वय साधण्यासाठी चर्चा करण्यात आली. पोलिस ठाणे हद्दीमधील एसटी महामंडळाचे लांजा आगार, नगरपंचायत, व्यापारी संघटना, भाजी विक्रेते, फेरीवाले, रिक्षा चालक-मालक संघटना, टेम्पो, माल वाहतूक चालक-मालक, खासगी बस चालक-मालक व ट्रॅव्हल्स एजंट, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, ईगल इन्फ्रा प्रायव्हेट लि. चे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
रिक्षा चालक-मालक यांना पार्किंग व्यवस्थेसंदर्भात महामार्गावर वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे रिक्षा लावू नये. तसेच गणेशोत्सवानिमित्त भाविक यांच्याकडून जास्त भाडे आकारण्यात येऊ नये. पार्किंगसाठी जागा ठरवण्यात आली. यासह खासगी बस मालक, ट्रॅव्हल्स एजंट यांना भाविकांना ये-जा करताना तसेच खाजगी बस जाण्याच्यावेळी रस्त्यावर गर्दी होऊ नये यासाठी पार्किंग ठरवून देण्यात आले. शहरातील किरकोळ विक्रेते फेरीवाले यांना वाहतुकीस अडथळा होईल अशाप्रकारे आपली दुकाने न लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या. आठवडाबाजार, गणेशोत्सवावेळी लावण्यात येणाऱ्या टपऱ्यांना मार्किंग करून जागा निश्चित करून देण्याच्या सूचना नगरपंचायतीला देण्यात आल्या.
चौकट
महामार्गावरील खड्डे भरण्याच्या सूचना
महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीला रस्त्यावर खड्डे भरण्याबाबत आदेश देण्यात आले. महामार्गानजीक रस्ते दुरुस्तीसाठी ठेवलेले साहित्य उत्सव काळात बाजूला करून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.