स्वानंद पठण मंडळाने सादर केली स्तोत्रकाव्यांजली
-rat१०p३५.jpg-
P२५N८३४६१
रत्नागिरी : संस्कृत भारती आयोजित संस्कृत सप्ताहानिमित्त स्तोत्रकाव्यांजली सादर करताना स्वानंद पठण मंडळाच्या भगिनी.
------
‘स्वानंद’कडून स्तोत्रकाव्यांजली सादर
संस्कृत भारती ; संस्कृत सप्ताहाला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : संस्कृत भारतीतर्फे आयोजित संस्कृत सप्ताहानिमित्त स्वानंद पठण मंडळाने सादर केलेल्या ‘स्तोत्रकाव्यांजली’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. सर्व स्तोत्रांचा मूळ बाज न घालवता त्यांना साजेशा चाली देऊन ही स्तोत्र सुरेल आवाजात सादर करण्यात आली.
शेरे नाका येथील रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम झाला. सुरुवातीला संस्कृत भारतीच्या कोकण प्रांत अध्यक्ष डॉ. कल्पना आठल्ये यांनी स्वानंद पठण मंडळाच्या सर्व सदस्यांचे पुस्तक व भेटवस्तू देऊन स्वागत केले. निवेदन नेत्रा मोडक यांनी केले. अक्षया भागवत यांनी आभार मानले. स्वानंद पठण मंडळाच्या प्रमुख रेखा जोशी आणि स्वरदा जोशी, वैशाली चितळे, योजना घाणेकर, मानसी फडके, अनिता पेंढारकर, शुभांगी मुळे, कीर्ती आठवले, माणिक पाटणकर, वृंदा गोखले, संपदा पेठे यांनी ही स्तोत्रे सुरेखरित्या सादर केली. स्तोत्रांना स्वरदा जोशी यांनी चाली लावल्या आहेत.
सुरुवातीला जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी रचलेले भुजंग प्रयात स्तोत्र सादर केले. यात गणपतीची विविध रुपे, त्याचे तेज, करुणा, विद्या व शक्ती यांचे सुंदर वर्णन आहे. या स्तोत्रामुळे वाचासिद्धि, कामनापूर्ती, विघ्न निवारण होते. त्यानंतर ध्यान, जप आणि स्तवन या तिन्हींचा अनुभव देणारे सांब स्तुती स्तोत्र, जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य रचित श्री त्रिपुरा सुंदरी स्तोत्र सादर केले.
चौकट १
राघव यादवीयम द्व्यर्थी काव्य
अत्यंत अद्वितीय व विलक्षण संस्कृत काव्य म्हणजे राघव यादवीयम्. पं. वेंकटाध्वरी या अष्टावधान पंडितांनी हे रचलेले हे द्व्यर्थी काव्य या वेळी स्वानंद पठण मंडळाच्या भगिनींनी सुरेख सादर केले. या काव्याची विशेषता म्हणजे हा श्लोक डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे म्हटला तरी अर्थपूर्ण होतो, यालाच अनुलोम, विलोम काव्य म्हणूनही ओळखतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.