डेगवे मोयझरवाडी रस्त्याच्या 
डांबरीकरणास परवानगी द्या

डेगवे मोयझरवाडी रस्त्याच्या डांबरीकरणास परवानगी द्या

Published on

डेगवे मोयझरवाडी रस्त्याच्या
डांबरीकरणास परवानगी द्या
प्रवीण देसाई ः अन्यथा शुक्रवारी उपोषण
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० ः डेगवे तांबोळी रस्त्यावरील मोयझरवाडी येथील ७०० मीटर लांबीचा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी वनविभागाकडून आडकाठी होत आहे. हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने अडवणूक होत असल्याने स्वातंत्रदिनी शुक्रवारी (ता. १५) सावंतवाडी उपवनसंरक्षक कार्यालयासमोर डेगवे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्यासह उपोषणास बसण्याचा इशारा भाजपचे किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा डेगवेचे माजी सरपंच प्रवीण देसाई यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हा रस्ता हा पुढे १० ते १२ गावांना जोडत आहे. आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी जाताना पर्यटक या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात; मात्र हा रस्ता चिखलमय झाला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेळोवेळी लक्ष वेधूनही तसेच पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.
या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणास परवानगी मिळावी, यासाठी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी १० वाजता उपोषणास सुरुवात करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com