मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या मानेतील रक्तवाहिनीतील

मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या मानेतील रक्तवाहिनीतील

Published on

-rat१०p४९.JPG-
P२५N८३५४७
डेरवण : रुग्णासमवेत न्यूरोसर्जन डॉ. मृदुल भटजीवाले व भूलतज्ज्ञ डॉ. गौरव बावीसकर आणि इतर कर्मचारी.
----
रक्तवाहिनीतील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया
वालावलकर रुग्णालय ; मेंदूला रक्त वाहून नेणारी वाहिनी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : मेंदूला रक्त वाहून नेणारी मुख्य रक्तवाहिनी कॅरोटिड धमनीमध्ये मेदाच्या गुठळीमुळे ८५ टक्के ब्लॉक असलेल्या ७३ वर्षीय रुग्णावर वालावलकर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. मृदुल भटजीवाले यांनी भूलतज्ज्ञ डॉ. लीना ठाकूर आणि डॉ. गौरव बावीसकर यांच्या मदतीने पूर्ण केली.
मंडणगड तालुक्यातील वाईकर यांच्या शरीराच्या डाव्या बाजूला मुंग्या आणि जडपणा जाणवू लागला होता, त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी ३ जुलैला वालावलकर रुग्णालयात तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी आणले. डॉ मृदुल भटजीवाले (वालावलकर रुग्णालयाचे न्यूरोसर्जन) यांनी तपासणी केली. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीची एम.आर.आय एन्जोग्राफी व मानेच्या रक्तवाहिनींची कॅरोटिड कलर डॉप्लर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये मेंदूला रक्त वाहून नेणारी मुख्य रक्तवाहिनी असलेल्या कॅरोटिड धमनीमध्ये मेदाच्या गुठळीमुळे ८५ टक्के ब्लॉक असल्याचे दिसून आले. यामुळे भविष्यात मोठा पक्षाघात होण्याचा आणि जिवालाही धोका असतो, असे मुख्य न्यूरोसर्जन डॉ. मृदुल भटजीवाले यांनी सांगितले.

चौकट
फक्त २० मिनिटाचा अवधी
अशा शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूच्या पक्षाघाताचा झटका येण्याचा धोका असतो. कारण रक्तवाहिनी उघडून मेदाची गुठळी काढून टाकून ती बंद करावी लागते. जर हे २० मिनिटांत केले नाही. तर रुग्णाला अर्धांगवायूचा मोठा धोका असतो.

कोट
रक्तवाहिनीच्या आतील मेदाची गुठळी काढून टाकणे अशा क्लिष्ट शस्त्रक्रिया आता वालावलकर रुग्णालय सावर्डे येथे होऊ लागल्या आहेत. अद्ययावत उपकरणे आणि वालावलकर रुग्णालयात उपलब्ध असलेल्या तज्ज्ञ डॉक्टर्समुळे हे सहजशक्य झाले आहे. पूर्वी अशा क्लिष्ट जोखमीच्या शस्त्रक्रिया फक्त मुंबई किंवा पुणे या ठिकाणी केल्या जात होत्या. आता वालावलकर रुग्णालय, सावर्डे येथे आशा क्लिष्ट शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमार्फत मोफत केल्या जात आहेत.
-डॉ. सुवर्णा पाटील, संचालिका, डेरवण रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com