नागालँड, मणिपूरच्या विद्यार्थिनींनी
चिपळूण पोलिसांना बांधल्या राख्या

नागालँड, मणिपूरच्या विद्यार्थिनींनी चिपळूण पोलिसांना बांधल्या राख्या

Published on

नागालँड, मणिपूरच्या विद्यार्थिनींनी
चिपळूण पोलिसांना बांधल्या राख्या
चिपळूण : चिपळूण येथील छात्रावासात राहणाऱ्या नागालँड व मणिपूर येथील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्यानिमित्ताने चिपळूण पोलिस ठाण्यात हजेरी लावून पोलिसांना राख्या बांधून सणाचा आनंद वाटला. या विद्यार्थिनींनी पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे तसेच उपस्थित पोलिस अधिकारी व अंमलदारांना राख्या बांधल्या. यावेळी त्यांनी मराठीतील गणेश आगमन गीतही सादर केली. या उपक्रमाचे कौतुक करत पोलिस अधीक्षक बगाटे यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या आणि सांस्कृतिक जडणघडीत त्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

रत्नागिरीत आज उद्योजकता विकास परिषद
चिपळूण ः रत्नागिरी येथे सोमवारी (ता. ११) जिल्हा उद्योग विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे ही परिषद घेण्यात आली आहे. यामध्ये माजी केंद्रीय रेल्वे आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाचा उद्योजकांशी संवाद, जिल्हा उद्योजकता पुरस्काराचे वितरण उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सत्कार आणि मंत्री सामंत यांची मुलाखत होणार आहे. श्रद्धा साफल्य मंगल कार्यालयात होणाऱ्या या परिषदेत उद्योग मंत्री सामंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरणही होणार आहे, अशी माहिती राजू सावंत यांनी दिली. जीवनगौरव पुरस्कारासाठी नामवंत शास्त्रज्ञ उद्योजक पद्मश्री डॉ. के. एच. घरडा यांना देण्यात येणार आहे. सीएसआर पुरस्कार विनंती ऑरगॅनिक लिमिटेड कंपनीला देण्यात येणार आहे. जिल्हा उद्योजकता पुरस्कारासाठी अभिषेक एंटरप्राइजेस (गुहागर), फायरटेक इक्विपमेंट सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड (चिपळूण), एम. के. इंजिनिअर्स अँड एक्स्पोर्ट (रत्नागिरी), प्रांजल पॉलिमर (दापोली), साखरकर बेकरी (राजापूर), विजय स्वप्न इन्फोटेक (चिपळूण) यांना देण्यात येणार आहे.

मुंबईत आज गुहागरवासीयांचा मेळावा
चिपळूण ः मुंबईत राहणाऱ्या गुहागरवासीयांचा मेळावा सोमवारी (ता. ११) दादर येथील शिवसेना भवनात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. आमदार भास्कर जाधव यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. गुहागर तालुका ब्राह्मण साहाय्यक संघाने काढलेले पत्र, त्यावर आमदार आमदार जाधव यांनी पत्राद्वारे दिलेले प्रत्युत्तर, यावरून संघर्ष पेटलेला असताना मुंबईत गुहागर विधानसभा मतदारसंघातील मुंबईवासी नागरिकांचा होणारा मेळावा चर्चेचा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com