भरणेतील पतसंस्थेत ४ कोटी २२ लाखांचा अपहार

भरणेतील पतसंस्थेत ४ कोटी २२ लाखांचा अपहार

Published on

भरणेतील पतसंस्थेत ४.२२ कोटींचा अपहार
१६ जणांवर गुन्हा ः अध्यक्ष, उपाध्यक्षांचाही समावेश
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १० : भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत ४ कोटी २२ लाख ८१ हजारांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी पदाधिकारी, संचालक, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅशिअर आणि लिपिक अशा १६ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सहकार विभागाच्या विशेष लेखापरीक्षक विनोद वामनराव अंड्रस्कर यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार २०२३ - २४ आणि २०२४ - २०२५ या कालावधीत संस्थेचे लेखापरीक्षण केले. त्यात कर्जवाटपात नियमांचे उल्लंघन, खोट्या सही, तारणाशिवाय कर्ज, बनावट मुदत ठेव पावत्या तयार करणे, रोख रकमेची बेकायदेशीर उचल, इतर कर्ज खात्यांना रक्कम वळती अशा गंभीर गैरव्यवहारांचा पर्दाफाश झाला.
या प्रकरणी अध्यक्ष दत्ताराम बाळा बैकर, उपाध्यक्ष सुधाकर रामभाऊ शिंदे (रा. भरणे), सदस्य दत्ताराम भिकू धुमक (रा. भडगाव), बाबाराम केशव तळेकर (रा. लवेल), दीपक केशव शिगवण (गुणदे), सुरेश कृष्णा पड्याळ (भरणे), सखाराम सोनू सकपाळ (सुकीवली), तुकाराम रामू साबळे (सुकीवली), सौ. तेजा राजाराम बैकर (भरणे), सौ. रेवती चंद्रकात खातू (भरणे), मुरलीधर दत्तात्रय बुरटे (खेड), सुभाष भिकू शिंदे (भरणे शिंदेवाडी), माजी उपाध्यक्ष शशिकांत नथुराम शिंदे (नातूनगर), माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. प्रिया योगेश सुतार (वेरळ), कॅशिअर अभिजित रमेश नलावडे (भरणे घडशीवाडी), लिपक रूपेश चंद्रकांत गोवळकर (वेरळ खडकवाडी) या १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.

चौकट
अपहाराचा तपशील
मुदत ठेव तारण कर्ज ः ३ कोटी २३ लाख ५५ हजार १४९ रुपये
अल्प बचत ठेव तारण कर्ज ः ३९ हजार १९ हजार २६० रुपये
स्थावर तारण कर्ज ः ५ लाख
आवर्त ठेव तारण कर्ज ः ११ लाख ५० हजार रुपये
व्यवसाय कर्ज ः ३६ हजार २०० रुपये
बनावट मुदत ठेवी पावत्या ः ४३ लाख २० हजार ४१२ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com