रत्नाकर चव्हाणचे सीएमएच्या अंतिम परीक्षेत यश
- rat१३p५.jpg-
२५N८४१२५
रत्नाकर चव्हाण
रत्नाकर चव्हाणचे ‘सीएमए’मध्ये यश
२१व्या वर्षी केली कामगिरी; सामान्य कुटुंबातील तरुण
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १६ ः सीएमएच्या (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट) अंतिम परीक्षेत केवळ २१व्या वर्षी ओझर (राजापूर) येथील रत्नाकर चव्हाण याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (आयसीएमएआय) यांच्यामार्फत जून २०२५ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
सीएमए करण्याचा ध्यास घेत रत्नाकर याने प्रथम इंटरमिजिएट परीक्षा आणि आता अंतिम परीक्षा, अशा दोन्हीही उच्च गुणांसह उत्तीर्ण करत आपल्या मेहनतीचा व चिकाटीचा आदर्श घालून दिला आहे. रत्नाकरचे वडिलाचा पारंपरिक सलून व्यवसाय असून, गेली २० वर्षे ते लांजा शहरात व्यवसाय करत असून, रहिवासी आहेत. त्याच्या कुटुंबात वडील, आई, मोठा भाऊ आणि रत्नाकर असं छोटं कुटुंब. सर्वसामान्य कुटुंबाच्या पार्श्वभूमीवरून रत्नाकरने मिळवलेले हे यश गावासह जिल्ह्याचा अभिमान वाढवणारे आहेत. कठोर परिश्रम, शिस्त आणि ध्येयनिष्ठा असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, असा संदेश रत्नाकर याने आपल्या यशातून दिला आहे. आता तो सीएमए म्हणून करिअरमध्ये पुढील पायरी गाठण्यास सज्ज झाला आहे. निवृत्त शिक्षक व प्राथमिक शिक्षणसेवक पतपेढीचे माजी संचालक प्रकाश पाध्ये व ओझर ग्रामपंचायतीचे सदस्य जहीर टोले यांनी रत्नाकरचे अभिनंदन केले. रत्नाकरने मिळवलेल्या या यशाबदल राजापूर आणि लांजातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
चौकट
असे झाले त्याचे शिक्षण
रत्नाकरचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ओझर येथे चौथीपर्यंत झाले. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा येथे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण त्याने रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात घेतले.