बांद्यात रविवारी आरोग्य शिबिर

बांद्यात रविवारी आरोग्य शिबिर

Published on

बांद्यात रविवारी आरोग्य शिबिर
बांदा, ता. १३ः भाजप बांदा शहर प्रभाग क्रमांक दोनच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी रविवारी (ता. १७) मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर बांदा विकास संस्थेच्या अळवणी सभागृहात होणार आहे. या शिबिरात हिमोग्लोबिन, लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स, कोलेस्टेरॉल, किडनी, लिव्हर टेस्ट, थायरॉईड तसेच रुग्णांकरिता सर्व आवश्यक रक्त तपासण्या करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी बांदा शक्तीकेंद्र प्रमुख मनोज कल्याणकर, बांदा मंडल उपाध्यक्ष गुरुदत्त कल्याणकर, बूथ अध्यक्ष राकेश केसरकर, साईशकुमार केसरकर, महिला शहर अध्यक्ष स्मिता पेडणेकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
.................
swt1327.jpg
N84298
तुळसः विद्यामंदिरात १२५ झाडांची लागवड करण्यात आली.

तुळस विद्यामंदिरच्या परिसरात वृक्षारोपण
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १३ ः पर्यावरण रक्षणाची जाणीव आणि मातृप्रेमाची भावना यांचा समन्वय साधणाऱ्या ‘एक पेड माँ के नाम’ या अनोख्या उपक्रमांतर्गत श्री वेताळ विद्यामंदिर तुळस येथे १२५ सुपारी आणि सोनचाफा झाडांची लागवड करण्यात आली. यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरविंद नाईक यांनी झाडे उपलब्ध करून सहकार्य केले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मातेसमोर एक झाड लावून ते झाड तिच्या नावे समर्पित केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अदिती तांबोसकर, उपाध्यक्षा विभा आंगणे, मुख्याध्यापक प्रशांत हरमलकर, शिक्षिका लीना नाईक, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ज्ञ डॉ. सचिन परुळकर, गायत्री आरमारकर, अर्पिता नाईक, मुग्धा लिंगोजी, अक्षरा साळगावकर, माधुरी राऊळ, जान्हवी सावंत, योगिता गावडे, शिवानी सावंत, वैदेही राऊळ, दर्शना तुळसकर आदी पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पालकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत झाडांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.
..................
swt1328.jpg
N84299
उभादांडा ः लक्ष्मी शंकर देवजी ट्रस्टतर्फे वह्या वाटप करण्यात आले.

देवजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे
उभादांडा येथे वह्या वाटप
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १३ ः ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या उभादांडा येथील लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. हा कार्यक्रम केपादेवी मंदिरात झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, ज्येष्ठ भजनी बुवा सावळाराम कुर्ले, उभादांडा ग्रामपंचायतीचे सदस्य नम्रता कुर्ले, राजन कुर्ले, भानुदास कांबळी, ट्रस्टचे सहसचिव हरिश्चंद्र गिरप, सल्लागार रामचंद्र देवजी, दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोन्सूरकर, श्री. घाडी, सचिन ठाकरे आदी उपस्थित होते. लवकरच या ट्रस्टतर्फे किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com