रत्नागिरी- चाकरमान्यांच्या परतीसाठी रत्नागिरी विभाग सज्ज

रत्नागिरी- चाकरमान्यांच्या परतीसाठी रत्नागिरी विभाग सज्ज

Published on

आले गणराय - लोगो

चाकरमान्यांच्या परतीसाठी रत्नागिरी विभाग सज्ज
विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसेः २५०० फेऱ्यांचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार असून, चाकरमानी मोठ्या संख्येने एसटीने कोकणात दाखल होणार आहेत. या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी २५०० गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
गणपती परतीच्या वाहतुकीसाठी ११ ऑगस्टपासून आगाऊ आरक्षण सुरू झाले. त्यामुळे बोरिवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, विरार, भांडूप, भाईंदर या मार्गावरून आरक्षणाला प्रतिसाद मिळू लागला आहे. सर्व आगारातून २३ ऑगस्टपासून ७ सप्टेंबर या कालावधीत बोरिवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, विरार, भांडूप, भाईंदर या मार्गावर बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गौरी-गणपतीसाठी पूर्णक्षमतेने आरक्षित झालेल्या जादा फेऱ्या (आगारनिहाय) मंडणगड ७७, दापोली ९५, खेड १०२, चिपळूण १४२, गुहागर १०६, देवरूख ९८, रत्नागिरी ८५, लांजा ४३, राजापूर ४२, एकूण ७९०.
--
चौकट
आगार परतीसाठी जादा फेऱ्या दैनंदिन फेऱ्या
मंडणगड ९७ १८
दापोली १२८ ३०
खेड १३६ ३४
चिपळूण १७२ २१
गुहागर ११९ २०
देवरूख १४७ १०
रत्नागिरी ९५ १४
लांजा ५३ २
राजापूर ५२ ६
----
एकूण ९९९ १५५
----
कोट
प्रवाशांना ग्रुप बुकिंगची सुविधा सुद्धा केली आहे तसेच तिकीट बुकिंगसाठी रा. प. बसस्थानकावर, खासगी एजंट यांच्यामार्फत किंवा मोबाईल अॅपद्वारे बुकिंगची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. चालक, वाहकांना सुरक्षित वाहतूक करण्याच्या आणि प्रवाशांना सेवासुविधा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com