‘बुद्धिबळा’त सोहम, चेतन, समर्थ विजेते

‘बुद्धिबळा’त सोहम, चेतन, समर्थ विजेते

Published on

84459

‘बुद्धिबळा’त सोहम, चेतन, समर्थ विजेते
वेंगुर्ले ः आयडियल चेस अॅकॅडमी वेंगुर्लेतर्फे घेतलेल्या मुलामुलींच्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात सोहम देशमुख, १४ वर्षांखालील गटात चेतन भोगटे, तर १० वर्षांखालील गटामध्ये समर्थ गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात झालेल्या स्पर्धेत १५८ स्पर्धक सहभागी झाले. स्पर्धेचे उद्‍घाटन टांककर शेटये ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन शेटये यांच्या हस्ते झाले. विजेते अनुक्रमे असे ः १९ वर्षांखालील गट-सोहम देशमुख, विभव राऊळ, रुद्र मोबारकर, यथार्थ डांगी, मयुरेश परुळेकर, मिनल सुलेभावी, तनिष तेंडोलकर, वरद तवटे, सौरभ धारगळकर, दुर्वांक मलबारी. १४ वर्षांखालील गट-चेतन भोगटे, गुणवंत पाटील, गार्गी सावंत, वेदांत भोसले, हर्ष राऊळ. १० वर्षांखालील गट-समर्थ गावडे, विहान अस्पतवार, अन्वय सापळे, दुर्वांक कोचरेकर, विघ्नेश आंबापूरकर. पंच म्हणून कौस्तुभ पेडणेकर, श्री. आडेलकर यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण जनार्दन शेटये, स्पर्धेचे आयोजक नागेश धारगळकर, कौस्तुभ पेडणेकर, श्री. आडेलकर यांच्या हस्ते झाले. प्रदीप प्रभू यांनी सूत्रसंचालन केले.
----
84456

देवगडमध्ये ड्रग्जविरोधात जागृती
देवगड ः येथील न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि येथील तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रॅगिंग व ड्रग अ‍ॅबुज’ विषयावर जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘रॅगिंग’ विषयावर अ‍ॅड. रिया माणगावकर यांनी, तर ‘ड्रग अ‍ॅबुज’ विषयावर अ‍ॅड. अन्वी कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दोघांनीही रॅगिंग व अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, त्यावरील कायदेशीर तरतुदी आणि प्रतिबंधात्मक उपाय स्पष्ट समजावून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. पर्यवेक्षक मिलिंद भिडे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी मनोहर तेली, सहायय्यक कार्यक्रम अधिकारी स्नेहल जोईल यांच्यासह श्री. जाधव उपस्थित होते.
................
84461

स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाइकांचा सन्मान
वेंगुर्ले ः स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपरिषदेतर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक विलास पडवळ व प्रथमेश गुरव यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे स्थापत्य अभियंता विशाल होडावडेकर, लेखापाल अभिजित पाटील, माजी प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, निशा आळवे, सहायक कर निरीक्षक स्नेहल शिंदे, लिपिक मंदार चौकेकर, प्रथमेश कसालकर, संदीप परुळेकर, विठ्ठल सोकटे, पंकज केळुसकर आदी उपस्थित होते.
....................
84462
‘मार्शल आर्ट’मध्ये आचरा प्रशालेचे यश
आचरा ः कणकवली येथे झालेल्या १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय ‘सिकाई मार्शल आर्ट’ स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेचा विद्यार्थी आविष्कार म्हामाने यांने उज्ज्वल यश प्राप्त केले. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्व संस्था चालक, प्रशालेचे मुख्याध्यापक घुटुकडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
.................
84464

बांदा स्वामी समर्थ मठास समई प्रदान
बांदा ः बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळातर्फे येथील श्री स्वामी समर्थ मठाला पूर्वसंकल्पानुसार दोन समई प्रदान करण्यात आल्या. हा कार्यक्रम मंगळवारी दुपारी झाला. यावेळी मंडळातर्फे श्री स्वामी समर्थांच्या चरणी श्रीफळ ठेवून गाऱ्हाणे घालण्यात आले. दोन्ही समई श्री स्वामींसमोर प्रज्वलित करण्यात आल्या. सामूहिक नामस्मरण, प्रार्थना तसेच आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसाद वाटला. यावेळी बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com