''भविष्यातील विकासासाठी अधिसूचित'' शेरा रद्द करा

''भविष्यातील विकासासाठी अधिसूचित'' शेरा रद्द करा

Published on

N84526

‘भविष्यातील विकासासाठी अधिसूचित’ शेरा रद्द करा
रानबांबुळी ग्रामस्थः महसूल मंत्री बावनकुळेंना निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १४ ः जिल्हा मुख्यालय, कोकण रेल्वे आणि लघु पाटबंधारे धरण या तीन प्रकल्पांसाठी रानबांबुळी गावातील शेतकऱ्यांनी
सर्वात जास्त जमीन संपादित करून दिली आहे. मात्र, असे असताना सर्वे नंबर १४ मधील क्षेत्र भविष्यातील विकासासाठी अधिसूचित असा शेरा मारण्यात आला आहे. तो कमी करण्यात यावा आणि ती जमीन शेतकऱ्यांना व्यवसाय उद्योग, रोजगार उभारण्यासाठी खुली करावी, असे आदेश द्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रानबांबुळी ग्रामस्थांनी दिले आहे. यावर मंत्री बावनकुळे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन या प्रश्नी धोरणात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
रानबांबुळी गावातील सर्वात जास्त क्षेत्र जिल्हा मुख्यालय उभारणीसाठी संपादित झाले आहे. त्याचबरोबर याच गावातील क्षेत्र कोकण रेल्वे प्रकल्प, दाबाचीवाडी धरण प्रकल्प यासाठीही संपादन केले. या गावातील १९०.९३.२५ हेक्टर जमीन विविध प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालय, कोकण रेल्वे, तलाव या तीन प्रकल्पांसाठी संपादन क्षेत्रात जिल्हा मुख्यालय १०४.७० हेक्टर आर, रस्ते सडक १६.७३.४५, कोकण रेल्वे २७.१३.४० व लघु पाटबंधारे दाबाची वाडी धरण क्षेत्रासाठी ४२.४६.७० हेक्टर आर क्षेत्र संपादित केले आहे. १९९९ मध्ये झालेल्या अधिसूचनेमध्ये काही विविध प्रकल्पांसाठी आवश्यकता भासल्यास ७७.३१.०० हेक्टर आर क्षेत्र अधिसूचित करण्यात आले. मात्र, या संपादन अधिसूचनेनंतर गेली तीस वर्षे या संपादन प्रक्रियेवर कोणताही प्रकल्प शासनाने घेतला नाही, झाला नाही किंवा प्रस्तावितही नाही. वास्तविक पाहता रानबांबुळी गावातील शेतकऱ्यांचे कवडी मोलाने घेतलेले क्षेत्र पाहता १९९९ च्या अधिसूचनेत ७७.३१.००हेक्टर आर क्षेत्र पारंपारिक शेती निवासीवापर झोन या नावाखाली ठेवण्यात आले होते. यात १४ सर्वे नंबर पारंपारिक निवासी वापर क्षेत्र असे होते. आता यात २६ एप्रिल २०२४ च्या तहसीलदार कुडाळ यांच्या पत्रानुसार भविष्यकालीन विकासासाठी अधिसूचित असा शेरा नमूद करण्यात आला आहे. तो कमी करण्यात यावा व ती जमीन शेतकऱ्यांना विकसित करण्यासाठी खुली करून देण्यात यावी. जिल्हा मुख्यालयासाठी घेण्यात आलेल्या संपादक क्षेत्रामधील काही जमीन प्राधिकरणमार्फत दाम दुप्पट रक्कमेने विक्री केली जात आहे. अद्यापही जिल्हा मुख्यालयाचा म्हणावा तसा संपादित जागेत विकास झालेला दिसत नाही तसेच स्थानिक शेतकऱ्यांना जिल्हा मुख्यालय व कोकण रेल्वे यासारख्या प्रकल्पामुळे झालेल्या विकासाच्या फायदा शेतकऱ्यांना घेता येत नाही. सर्वे नंबर १४ मधील शेतकरी या अधिसूचनेमुळे विकासापासून वंचित राहिले आहेत. नवीन पिढीतील तरुणांना या प्रकल्पामध्ये नोकरीही मिळाल्या नाहीत व व्यवसाय करण्यासाठी या अधीसूचनेमुळे स्वतःची जमीन असून सुद्धा संधी मिळत नाही. यासाठी भविष्यकालीन विकासासाठी अधिसूचित असा शेरा असलेला हे क्षेत्र वगळण्यात यावे, अशी मागणी रानबांबूळी ग्रामपंचायत माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष भाई गावडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरपंच परशुराम परब आणि येथील ग्रामस्थांनी मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com