अरूंद रस्त्यात साईडपट्टी खोदाईने २ बस कलंडल्या
rat१४p१६.jpg-
२५N८४४७५
रत्नागिरी- शहराजवळील मजगांव रोड, प्रशांतनगर येथे साईडपट्टीची खोदाई केल्यामुळे अरुंद रस्त्यात कलंडलेली एसटीची बस.
साईडपट्टी खोदाईमुळे बस कलंडल्या
मजगांव-प्रशांतनगर मार्ग; सलग दोन दिवस अपघात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः शहराजवळील मजगांव रोड, प्रशांतनगर रस्त्यावर बुधवारी व गुरूवारी (ता. १४) अरुंद रस्त्यात साईडपट्टीची खोदाई केल्यामुळे एसटीच्या दोन गाड्या कलंडल्या. या अपघातामध्ये दैव बलवत्तर म्हणून प्रवासी बचावले. कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या अरुंद रस्त्यात खोदाई केल्यामुळे हे अपघात झाले. ठेकेदाराच्या या मनमानी कारभारावर व लोकप्रतिनिधी, प्रशासनावर नागरिकांनी आगपाखड केली.
बुधवारी (ता. १३) संध्याकाळी याच रस्त्यावर एक गाडी कलंडली होती. गुरूवारी (ता. १४) सकाळीसुद्धा दुसरी गाडी कलंडली. यामध्ये एसटी चालकाची काही चूक नव्हती कारण, रस्ता अरुंद होता तसेच या रस्त्यावर दोन महिन्यांपूर्वी रस्त्याच्या साईडपट्टीला खोदाई झाली होती. रस्त्याला लागूनच खोदाई करण्यात आली होती. त्या वेळी स्थानिक नागरिकांनी तेथे उभ्या असणाऱ्या सुपरवायझरला सांगितले होते. केलेली खोदाई बुजवताना दगडांचा वापर करा, नुसती माती टाकू नका. पावसाळ्यात समस्या निर्माण होईल. त्यावर तो म्हणाला होता की, इंजिनिअर साहेब सांगतील तसं करणार. तरीसुद्धा काम पूर्ण झाल्यावर त्यावर जेसीबीने नुसती माती टाकली गेली.
----------
कोट
प्रशासनाने वेळीच खोदाई केलेल्या रस्त्यावर डबर व माती टाकून बुजवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून सतत सुरू आहे.
- संतोष सनगरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.