भविष्यात भारतीय लष्कराच्या हाती रत्नागिरीत तयार झालेली शस्त्रास्त्र

भविष्यात भारतीय लष्कराच्या हाती रत्नागिरीत तयार झालेली शस्त्रास्त्र

Published on

rat१६p१२.jpg-
P२५N८४६६५
रत्नागिरी- भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजवंदनाप्रसंगी बोलताना पालकमंत्री उदय सामंत. सोबत अधिकारीवर्ग.
----
भारताचा ७९वा स्वातंत्र्यदिनाचा ध्वजवंदन सोहळा... लोगो

भविष्यात लष्कराकडे रत्नागिरीत तयार झालेली शस्त्रास्त्रे
डॉ. उदय सामंत ः पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य सर्वच बाबतीत जिल्हा अग्रेसर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले. शत्रूला जशास तसे उत्तर देणाऱ्या भारतीय लष्करांच्या हाती भविष्यात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तयार होणाऱ्या कारखान्यातील शस्त्रे असणार आहेत, ही आपल्यासाठी गौरवशाली बाब आहे. हा शस्त्राचा कारखाना रत्नागिरीत सुरू होणार आहे. पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य, अशा सर्वच बाबतीत रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर राहील, असा शब्द पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला.
भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते पोलिसपरेड ग्राऊंडवर मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, अप्पर पोलिस अधीक्षक बाबूराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरीतील शस्त्रास्त्राच्या कारखान्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून जमिनीचे संपादन सुरू आहे. व्हीआयटी सेमीकंडक्टरचा भव्य प्रकल्प रत्नागिरीत काही दिवसात सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जागा एमआयडीसीने व्हीआयटी सेमीकंडक्टरला प्रदान केली आहे.
अमेरिकेतील नासा संस्थेला सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी भेट देण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा परिषदेने देशात पहिल्यांदा सुरू केला. तीन वर्षात नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४६ आहे आणि १५० विद्यार्थी हे इस्रोला जाऊन आले. यामागचा उद्देश आपल्या जिल्ह्यातून एकतरी शास्त्रज्ञ निर्माण व्हावा आणि खऱ्या अर्थाने डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली व्हावी, या भावनेतून आज आपण हा उपक्रम राबवत आहोत. युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसास्थळांमध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ले जाहीर झाले. त्यामधील एक किल्ला सुवर्णदुर्ग हा आपल्या जिल्ह्यातील किल्ला आहे. अकराही किल्ल्यांची देखभालदुरुस्ती करणे, पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करणं यामध्ये रत्नदुर्ग किल्ल्याचाही समावेश करणे ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे. आज पर्यटनाच्यादृष्टीने शिवसृष्टी, तारांगण, छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक पाहण्यासाठी रत्नागिरीत लाखो पर्यटक येत आहेत. आपल्या जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये अजून एक भर पडणार आहे, ती म्हणजे कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरील स्मारक! यासाठी जो काही निधी लागेल तो देण्याचे आश्वासन महाराष्ट्र शासनाने दिले आहे. सर्वच बाबतीत रत्नागिरी जिल्हा हा अग्रेसर राहिला आहे.
----
किसान योजनेतून ७०४ कोटीचे वितरण
आंबा-काजू बागायतदार यांना देखील न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. किसान सन्मान योजनेंतर्गत २० हप्त्यांचे वाटप शेतकऱ्यांना झाले आहे. ७०४ कोटी ३९ लाख रुपयांचे वितरण शासनामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. आंबा बागायतदारांसाठी सिंधुरत्न योजनेतून ९५ वाहनांची उपलब्धता साडेतीन लाख सबसिडीवर करून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com