पाचलमधील हंडी पाच थरावर फोडली
-rat१६p३०.jpg -
२५N८४७६५
राजापूर ः मानवी मनोरे उभे करत दहीहंडी फोडताना शिवशक्ती महिला गोविंदापथक.
--------
पाचलच्या दहीहंडीत महिलांचे पाच थर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः तालुक्यातील पाचल बाजारपेठ येथे दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. पाच थरांचे मानवी मनोरे उभे करत शिवशक्ती महिला गोविंदापथकाने दहीहंडी फोडली आणि २५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस आणि चांदीची गदा जिंकली.
विजेत्या शिवशक्ती महिला गोविंदापथकाला युवानेत्या अपूर्वा सामंत यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी सुरेश ऐनारकर, संदीप बारसकर, सुनील गुरव, सोनू पाथरे, सचिन पांचाळ, वैभव वायकूळ, मयूर रेडीज, राहुल गोसावी, संदीप गुरव आदी शिवसेना कार्यकर्त्यांसह संदीप परटवलकर आदी उपस्थित होते. दहीहंडी उत्सवाचा थरार अनुभवण्यासाठी सकाळपासून ग्रामस्थांसह भाविकांनी मोठ्या संख्येने बाजारपेठेमध्ये गर्दी केली होती.