मंडणगडातील टँकरमधून होणारी डिझेल चोरी उघड
-Rat१६p५.jpg-
२५N८४६६९
मंडणगड: पोलिसांना ताब्यात घेतलेला टँकर.
----
टँकरमधून होणारी डिझेल चोरी उघड
मंडणगड आगाराची सजगता; चालक, क्लीनरविरोधात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १६ ः महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मंडणगड आगारास इंधन पुरवणाऱ्या टँकरच्या माध्यमातून होणारी इंधन चोरी आगार व्यवस्थापनाने दाखवलेल्या सजगतेमुळे समोर आली आहे. या घटनेसंदर्भात मंडणगड पोलिस ठाण्यात १५ ऑगस्टला तक्रार दाखल करून चालक क्लीनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगार व्यवस्थापक मदनीपाशी जुनैदी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडणगड आगारात टँकर १४ ऑगस्टला सकाळी दाखल झाला. इंधनाचा टँकर दुपारी दीडच्या सुमारास खाली करण्यात आला. टँकर पूर्णपणे खाली करून घेतल्यानंतर आगारातील सुरक्षारक्षकांनी टँकरवर चढून टँकरची तपासणी केली. टँकर हा पूर्णपणे रिकामा झालेला आढळला; परंतु १२ हजार लिटरचा टँकर हा आगारातील अंडरग्राऊंड टाकीमध्ये उतरवून घेतल्यानंतर अंडरग्राऊंड टाकीतील तफावत हे ३०१ ने वाढल्याने टँकरमधील इंधनाबाबत आगार व्यवस्थापनास शंका आली. त्यामुळे टँकर पुन्हा एकदा कसून तपासणी केला असता टँकरच्या कम्पार्टमेंट क्र. ३ व ४ मध्ये लॉकिंग डिव्हाईसजवळ एक स्टील पाईप कॉक फिरवला होता व कम्पार्टमेंट क्र. ३ मध्ये डिझेल येत असल्याचे दिसून आले तसेच एक छुपा कप्पा केला असल्याचे निदर्शनात आले. चालकाने टँकरमधील डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न करून राज्य परिवहन महामंडळाची इंधन चोरी करून फसवणूक केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी टँकरचालक मोहन श्यामराव देवकाते (वय ४०, रा. डोंगरगाव सांगोला, सोलापूर), क्लीनर शाहू सूर्यवंशी (वय २७, रा. करनार रोड, मिरज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ६१ लिटर डिझेल मुद्देमाल ताब्यात घेतले असून, पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.