पत्रादेवी-मडगाव बस ‘बांदेश्वर’कडून न्या
84803
पत्रादेवी-मडगाव बस ‘बांदेश्वर’कडून न्या
भाजप ः गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः बांदा हे गोव्याच्या सीमेवरचे शहर आहे. शहराच्या दशक्रोशीतून अनेकजण गोव्याला जात असतात. त्यामुळे पत्रादेवी ते मडगाव बस बांदेश्वर मंदिरकडून गेली तर सर्वांसाठी सोयीस्कर होईल, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन दिले.
स्वातंत्र्यदिनी पत्रादेवी हुतात्मा स्मारक येथे मुख्यमंत्री डॉ. सावंत आले होते. यावेळी भाजप महिला जिल्ह्याध्यक्ष कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, शहराध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, संतोष सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, हुसेन मकानदार, सुनील राऊळ, मंदार महाजन, गुरू कल्याणकर, नीलेश कदम आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या दशक्रोशीतून अनेक युवक-युवती शिक्षणासाठी, नोकरीसाठी, उपचारासाठी व अन्य काही कामासाठी गोव्यात जात असतात. सकाळी ७ वाजेपर्यंत गोव्याला जाण्यासाठी एकही बससेवा उपलब्ध नसते. जी मुले गोव्यात शिक्षण घेतात, त्यांना परीक्षेच्या वेळेला वेळेत पोहोचणे महत्त्वाचे असते. पत्रादेवी ते मडगाव बस सकाळी ६.२० वाजता महामार्गावरून निघते. ही बस बांदेश्वर मंदिरकडून गेली तर सर्वांना फायदा होईल. शिवाय सावंतवाडी ते पणजी, मडगाव ज्या बससेवा आहेत त्या महामार्गावरून न जाता बांदा शहरातून जाव्यात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.