क्राईम
आजाराला कंटाळून
तरुणीची आत्महत्या
खेड ः शहराजवळील भडगांव उसरेवाडी येथील डिंपल दीपक उसरे (वय २५) या तरुणीने आजारपणाला कंटाळून १४ ऑगस्टला दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घरामध्ये गळफास घेतला. डिंपल हिच्या डोक्यामध्ये गाठ होती. तिच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात औषधोपचार चालू होते. ती सतत आजारी असल्याने ती घरी असायची. अखेरीस आजारपणाला कंटाळून तिने आत्महत्या केली. या प्रकरणी खेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.
-rat१६p३५.jpg-
२५N८४८००
सावर्डे ः येथील अपघातग्रस्त वाहने.
सावर्डे बसस्थानकासमोर
तीन वाहनांचा अपघात
संगमेश्वर ः मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे बसस्थानकासमोर शनिवारी सकाळी ३ वाहनांचा अपघात झाला. एका मोटारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. या अपघातात तिन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून, सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. सावर्डे बसस्थानकासमोर असणाऱ्या सेवारस्त्यावर वाहने उभी असतात. एका मोटारचालकाने दोन वाहनांना धडक दिली. एकमेकांवर ही वाहने आदळल्याने हा अपघात घडला. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.