कर्तबगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप

कर्तबगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप

Published on

84968

कर्तबगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप

सिंधुदुर्गनगरीतील सोहळा; पालकमंत्री राणेंच्या हस्ते सत्कार

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १७ ः स्वातंत्र्य दिन कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी उपस्थित होते.
यावेळी अपघातग्रस्त ट्रकचालक व वाहकांना वाचविल्याबाबत पोलिस कॉन्स्टेबल विजय जाधव व किरण आडे, बुडणाऱ्या पर्यटनांना वाचविणारे तारकर्ली एमटीडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांच्यासह गणपत मोंडकर, तारकर्ली, वैषाली कुंभार, स्कुबा प्रशिक्षक इसदा, विजय अरविद टक्के, नवसाक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीत देशपातळीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९९.४९ टक्के लागला. या परीक्षेतील नवसाक्षर वंदना पारकर, निर्मला कावले, जयश्री कलकुटे, सुगंधा पेडणेकर, अनिता गरुड यांना तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीतील विद्यार्थी पारस दळवी (कलंबिस्त हायस्कूल), यशश्री ताम्हणकर (ॲड. माळगाव हायस्कूल), जनतेमध्ये अवयव दानाबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने नेत्रदान केलेल्या दात्यांचे नातेवाईक प्रमोद देसाई, रामचंद्र जगताप, गणेश परब, श्याम पेडणेकर यांना गौरविले. खारेपाटण येथील वीणा ब्रह्मदंडे यांनी मरणोत्तर अवयव दान केल्याने त्यांचे पती राजेद्र ब्रह्मदंडे यांचा गौरव केला. राज्य परिवहन सेवेत २५ वर्षे विनाअपघात सेवा दिलेले चालक मुकुंद लाड, सुनील तारी, सुभाष घाडीगावकर, संदीप शिरोडकर, अजित राणे, राजेंद्र खानविलकर, रत्नाकर राणे, अरुण सरदेसाई, रघुवीर नाईक यांच्यासह आंतरराष्ट्रीय जलतरणातील यशाबाबत पूर्वा गावडे हिला सन्मानित करण्यात आले. राज्यपुरस्कार शिबिरात जिल्ह्यातील स्काऊट, गाईड यांनी भाग घेऊन राज्य पुरस्कार प्राप्त केला. याबाबत महाराष्ट्र राज्यपालांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र लियोन पिंटो, चैतन्य वेंगुर्लेकर, जिगीष सावंत, जिग्निष सावंत, अनिकेत काळे, मयुरेश काळे यांना प्रदान करण्यात आले. कसई-दोडामार्ग येथील महिलेचे हरवलेले मंगळसूत्र परत केलेले सफाई कर्मचारी प्रताप राऊळ, सुनील आरोसकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी किसन क्रेडिट कार्ड वाटप केले. आंबोली, गेळे व चौकुळ (ता. सावंतवाडी) येथील कबुलायतदार गावकर जमिनी हस्तांतरीत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गेळे सरपंच सागर ढोकरे यांना आदेशाचे वितरण केले.
.....................
शेती संरक्षण शस्त्र परवान्यांचे वितरण
वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेती संरक्षण शस्त्र परवान्यांची परवानगी प्रक्रिया जिल्हा प्रशासनातर्फे नियमित केली जाते. वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे तसेच त्याच्या पिकांचे रक्षण व्हावे, यासाठी पात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे नियमानुसार शस्त्र परवाना दिला जातो. या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री राणे यांच्या हस्ते पात्र नवीन तसेच मृत परवानाधारक व्यक्तींच्या वारसांना शेती संरक्षण परवान्यांचे वितरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com