रत्नागिरी आगाशे विद्यामंदिरात दहीहंडी

रत्नागिरी आगाशे विद्यामंदिरात दहीहंडी

Published on

-rat१७p७.jpg-
२५N८४९२५
रत्नागिरी : दहीहंडी फोडताना कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरचे बालगोपाळ.
---
‘आगाशे’तील बालगोपाळांची दहीहंडी
रत्नागिरी, ता. १९ : येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा झाला. श्रीकृष्णाच्या पारंपरिक वेशभूषेत बालगोविंदा, गोपिकांनी फेर धरला. विविध कृष्णगीतांवर विद्यार्थ्यांनी सुरेख नृत्य सादर करून दुसऱ्या थरावर दहीहंडी फोडून गोपाळकाला गोड केला. शाळा समिती सदस्य दादा कदम, ज्येष्ठ शिक्षिका गीता सावंत, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले. महिला व पुरुष पालक प्रतिनिधींनी उत्सवासाठी विविध प्रकारची फळे आणली. पुरुष पालकांनी दहीहंडी सजवण्यासाठीही पुढाकार घेतला. मंजिरी गुणे व प्रेरणा नागवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com