शून्य अपघात, सुरक्षित महामार्गाचे ध्येय
85024
गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची पाहणी - लोगो
शून्य अपघात, सुरक्षित महामार्गाचे ध्येय
प्रवीणकुमार साळुंखेः अप्पर पोलिस महासंचालकांकडून बंदोबस्ताचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १७ ः गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महामार्ग सुरक्षा पोलिस कार्यरत राहतील. यंदा शून्य अपघात व सुरक्षित महामार्ग ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे अप्पर पोलिस महासंचालक वाहतूक प्रवीणकुमार साळुंखे यांनी सांगितले.
महामार्ग वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक प्रवीणकुमार साळुंखे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील बंदोबस्त तसेच येणाऱ्या भाविकांना कोणत्या अडचणी निर्माण होतील याची पाहणी केली. यावेळी रायगड परिक्षेत्र महामार्ग पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, पनवेल विभाग पोलिस निरीक्षक भरत शेंडगे, रायगड विभाग पोलिस निरीक्षक विनोद माळवे, रत्नागिरी विभाग पोलिस निरीक्षक दीपाली जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक राणी पाटील, पोलिस उपनिरीक्षक अनंत पवार उपस्थित होते. वाकण, महाड, कशेडी या तिन्ही मदत केंद्रांवर पोलिस निरीक्षक विनोद माळवे, चिपळूण, हातखंबा, कसाल येथे पोलिस निरीक्षक दीपाली जाधव यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक मदत केंद्रात असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत अडचणींबाबत साळुंखे यांनी चर्चा केली. तसेच गणपतीसाठी येणाऱ्या भाविकांनी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी त्यांनी पाहणीही केली. त्याठिकाणी लवकरात लवकर रस्ता वाहतुकीसाठी कसा सुरळीत करता येईल यावर संबंधित एजन्सीबरोबर चर्चाही केली. जड वाहतूक उभ्या करून ठेवण्याच्या जागांची पाहणी त्यांनी केली.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी क्रेन मालक आणि क्रेन चालक यांचे संपर्क क्रमांक, नाव, ठिकाण याची माहिती तसेच मृत्यूजय दुतांबाबतची प्रत्येक टॅबबॉईजचे गट कोणत्या ठिकाणी उपलब्ध असणार याची माहिती अद्ययावत ठेवा अशा सूचना साळुंखे यांनी दिल्या आहेत.
रस्ते देखभाल दुरुस्तीची सुरु असलेल्या कामांची ठिकाणे, एसटी बसस्थानकांचे संपर्क क्रमांक, वाहतूक पार्किंगच्या जागा, ढाबे, प्रसाधनगृहे तसेच हॉटेल्स याची माहिती असलेले फलक ठिकठिकाणी उभारण्यास त्यांनी सांगितले. याबाबतचे तक्ते तयार करुन महामार्गावर लावण्यास सांगितले. त्यात पोलीस ठाणे, सीएनजी पेट्रोल पंप, चार्जिंग स्टेशन केंद्र, टोइंग कारवाले, अग्निशामन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, हेल्पलाइन नंबर आणि राष्ट्रीय महामार्गावरील चालक-मालक संघटना अशांची नमूद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चौकट
२० ऑगस्टला पुन्हा आढावा
मदत पोलिस केंद्राच्या हद्दीतील ब्लॅक स्पॉट, बॉटल नेक पॉइंट याची माहिती व उपाय योजना, हद्दीमध्ये असलेली पोलिस ठाणी व तेथे असणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांचे मोबाईल नंबर याची यादी तयार ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. या सर्वांचा आढावा २० रोजी ते पुन्हा घेणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.