कोकण
संगमेश्वर बाजारपेठेतील दहीहंडी
- rat१७p१२.jpg-
P२५N८४९६१
संगमेश्वर बाजारपेठेत दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचताना गोविंदा पथक.
निनावी प्रासादिकने फोडली दहीहंडी
संगमेश्वर, ता. १९ ः संगमेश्वर येथील बाजारपेठेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत शिवसेना शाखा संगमेश्वर आयोजित दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक गोविंदा पथकं सहभागी झाली होती. मानाची दहीहंडी फोडण्याचा मान श्री निनावी प्रासादिक मंडळाने मिळवला तर राधाकृष्ण साखळकोंड गोविंदा पथकाने पाच थराचा मानोरा रचून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, जिल्हा संघटक संतोष थेराडे, उपतालुकाप्रमुख प्रकाश घाणेकर, महिला आघाडी उपतालुका प्रमुख मनीषा बने, नावडी विभाग प्रमुख प्रिया सावंत उपस्थित होते.