जवाहर चौकात पोलिसांकरीता दर्जेदार चौकी
-rat१७p३३.jpg-
२५N८५०५२
राजापूर ः जवाहरचौक परिसर
---
जवाहर चौकात पोलिसांकरिता उभारणार चौकी
लोकवर्गणीतून साकारणार ; कर्तव्य बजावताना ठरणार उपयुक्त
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः राजापूर शहराला गेल्या कित्येक वर्षापासून भेडसावणारी अर्जुना-कोदवली नद्यांना येणाऱ्या पूरस्थितीची समस्या लोकसहभागातून कमी करण्यामध्ये गाळ निर्मूलन समितीने महत्वाची भूमिका बजावली होती. गाळ निर्मूलन समितीने नागरी उपक्रमांतर्गत लोकवर्गणीतून शहरातील जवाहर चौक येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसाठी पोलिस चौकी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाळ निर्मूलन समितीच्या झालेल्या या बैठकीला नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, डॉ. उत्तम प्रभुदेसाई, इमेन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष मजीद पन्हळेकर, पत्रकार महेश शिवलकर आदींसह साई किरण कोठारकर उपस्थित होते.
दोन वर्षांपूर्वी लोकसहभागातून कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा करण्यात आला होता. गाळ उपशासाठी आवश्यक असलेल्या निधीची उभारणी करण्यासाठी शहरातील नागरिक, व्यापारी संघ, विविध सामाजिक संघटना यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. लोकसहभाग आणि शासकीय निधी याच्यातून झालेल्या गाळ उपशामुळे अर्जुना-कोदवली नद्यांना येणाऱ्या पुराच्या पाण्याची तीव्रता कमी झाली आहे. त्याचा फायदा शहरातील पूरस्थिती कमी होण्याला झाला आहे.
दरम्यान, २ लाख १७ हजारांच्या शिल्लक लोकवर्गणीतून शहरासाठी विनियोग करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्याबाबत झालेल्या चर्चेमध्ये सहभागी होताना सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ रसाळ, रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार यांनी शहरवासियासह तालुक्याबाहेरून दररोज शहरात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जवाहर चौकामध्ये अत्यावश्यक असलेल्या पोलिस चौकीची उभारणी व्हावी अशी सूचना केली. त्यांच्या या सूचनेवर सविस्तर चर्चा करताना सर्वानुमते पोलिस चौकी उभारण्याचे निश्चित करण्यात आले.
चौकट
विजेची व्यवस्था पालिकेकडून
पोलिस चौकी किमान दोन पोलिस कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे ठरविताना त्या पोलिस चौकीमध्ये नगरपालिकेने विद्युत व्यवस्था करण्याचे सूचित करण्यात आले. त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.