जीवन प्राधिकरण कार्यालयात चोरी

जीवन प्राधिकरण कार्यालयात चोरी

Published on

जीवन प्राधिकरण
कार्यालयात चोरी
रत्नागिरी : शहरातील नाचणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाचा मुख्य दरवाजा उचकटून चोरट्याने लॅपटॉप व सीपीयू असा २० हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी शासकीय कार्यालयात चोऱ्या करण्याकडे मार्चा वळविला असल्याची चर्चा मात्र रंगत आहे. ही घटना गुरुवारी (ता. १४) निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ ते १४ ऑगस्टला रात्रीच्या वेळस चोरट्याने कार्यालयाचा मुख्य दरवाजा कोणत्यातरी धारदार हत्याराने उचकटून आत प्रवेश करून कार्यालयातील लॅपटॉप व सीपीयू पळवून नेला. याप्रकरणी जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता योगेश नंजप्पा (वय ५५, रा. लक्ष्मी केशवनगर, कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
-
पतीकडून पत्नीला
मारहाण व दुखापत
रत्नागिरी : मद्याच्या नशेत पत्नीचे डोके भिंतीवर आपटून दुखापत करणाऱ्या पतीविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. दीपक कृष्णा सुतार (रा. खानू, सुतारवाडी, रत्नागिरी) असे दुखापत करणाऱ्या पतीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास खानू सुतारवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि संशयित हे नात्याने पती-पत्नी आहेत. दीपकला दारूचे व्यसन आहे. शुक्रवारी मद्याच्या नशेत त्याने पत्नी झोपलेली असताना तिच्या तोंडावर मारून तिला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिचे डोके भिंतीला आपटून दुखापत केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली.
---
गांजाचे सेवन करणाऱ्या
तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी : शहरातील रिमांड होम ते फणशी जाणाऱ्या रस्त्यावर एका आंब्याच्या झाडाखाली बसून गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. फहाद मुश्ताक पाटणकर (वय ३२, रा. ऑर्चिड अपार्टमेंट, शिवाजीनगर, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण हा बेकायदेशीर गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करत असताना आढळला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार विनोद कदम यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-------------
रेल्वेतून लाखोंची
ज्वेलरीची चोरी
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या जामनगर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने एक लाख ७० हजार १० रुपयांची ज्वेलरी पळविली. याबाबत शहर पोलिसांत चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी आठच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. याबाबात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुदलैवादिक अनंता पेरुमाल कोनर (वय ३४, रा. श्री रजा राजश्वरी टेंपल, शेल कॉलनी रोड, साईबाबानगर, चेंबूर (ईस्ट), मुंबई) या मंगळवारी जामनगर एक्स्प्रेसने प्रवास करत असताना रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान त्या झोपलेल्या असताना चोरट्याने सीट खाली ठेवलेली एक लाख ७० हजार १० रुपयांची ज्वेलरी असलेली बॅंग पळविली. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली.
.......
निवेंडीत घरफोडीत
साडेतीन लाखांचे दागिने पळविले
रत्नागिरी : तालुक्यातील भगवतीनगर-निवेंडी येथे घरफोडी करून चोरट्याने तीन लाख ५१ हजार ९६० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले. याबाबत जयगड पोलिसांत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २ ते बुधवारी (ता. १३ ऑगस्ट) रात्री अकराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अरुणा पर्शुराम घाग (वय ६२, रा. भगवतीनगर, निवेंडी, रत्नागिरी) यांच्या उघड्या घरामध्ये चोरट्याने प्रवेश करून घराच्या आतील खोलीतील कपाटामध्ये ठेवलेले तीन लाख ५१ हजार ९६० रुपयांचा दागिने पळविले. याप्रकरणी अरुणा घाग यांनी जयगड पोलिसांत तक्रार दिली.
------------
इलेक्‍ट्रिक पंपाचा शॉक
लागून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथील तरुणाला इलेक्‍ट्रिक पंपाचा शॉक लागला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याला तपासून मृत घोषित केले. मिथुन चंदू खेत्री (वय ३४, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १७) दुपारी एकच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिथुन हा भंगाराचा व्यवसाय करत असे. रविवारी दुपारी राहत्या घराजवळ इलेक्ट्रिक पंप पाण्यात टाकत असताना त्याला विजेचा शॉक लागला. ही बाब नातेवाइकांच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. अधिक उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com