कादवण येथे पाच बकऱ्या मृत

कादवण येथे पाच बकऱ्या मृत

Published on

बिबट्याच्या हल्ल्यात
कादवण येथे पाच बकऱ्या मृत
मंडणगड, ता. १७ ः तालुक्यातील कादवण देऊळवाडी येथील जंगली प्राण्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्या मृत पावल्याचा प्रकार शनिवारी (ता. १६) उघडकीस आले. या बकऱ्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मंडणगड तालुक्यातील कादवण देऊळवाडीमधील शेतकरी काशीराम सोंडकर यांच्या रानातील गोठ्यात शनिवारी रात्री जंगली प्राण्याने पाच बकऱ्यांना मारुन टाकले. त्यामध्ये तीन बकऱ्या आणि दोन बोकडांचा समावेश असून मारलेल्या पाचपैकी एक बकरी जंगली प्राणी घेवून गेला. मृत झालेल्या दोन बकऱ्या गाभण होत्या. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. बकऱ्यांवरील हल्ला वाघाने केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस असल्याने त्याचा फायदा वाघाने घेतला असावा असे ग्रामस्थांचे मत होते. मात्र मंडणगड परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. तिथे वाघ नाही, त्यामुळे मृत पावलेल्या बकऱ्या या बिबट्याने मारल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. त्या बकऱ्यांचा पंचनामा करुन जंगली प्राण्याचा बंदोबस्त करा अशी मागणी केली जात आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com