कलंबिस्त येथे वीरपत्नींचा सन्मान
85210
कलंबिस्त येथे वीरपत्नींचा सन्मान
भाजपचा पुढाकार; हुतात्मा स्मारकाचीही स्वच्छता
सावंतवाडी, ता. १८ ः आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीरपुत्रांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज कलंबिस्त येथील हुतात्मा स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. भाजप आंबोली मंडलाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात देशप्रेम आणि देशाभिमानाची भावना दिसून आली. यावेळी शहीद जवानांच्या वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला.
भाजप आंबोली मंडलाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या अभियानात स्थानिक शाळेतील विद्यार्थी, माजी सैनिक आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी सहभाग घेतला. सर्वांनी मिळून स्मारकाची आणि तेथील रणस्तंभांची स्वच्छता केली. तसेच हुतात्मा जवानांच्या प्रतिमेला आणि रणस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी महायुद्धात वीरमरण आलेल्या शहीद जवानांच्या वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला. या वीरांगनांमध्ये राजश्री सावंत, सरस्वती राजगे, सत्यवती पास्ते, सविता कदम, रोझिलिन रॉड्रिक्स, सुप्रिया पास्ते यांचा समावेश होता.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, आंबोली मंडल सरचिटणीस बाळू शिरसाठ, सैनिक बँकेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर आदींसह माजी सैनिक दीनानाथ सावंत, सुभाष सावंत, सगुण पास्ते, अनंत सावंत, प्रकाश सावंत, यशवंत सावंत, रामचंद्र सावंत, विश्वनाथ सावंत, गजानन सावंत, विलास पास्ते, भगवान पास्ते, अरुण पास्ते, दत्ताराम घोगळे, यशवंत तावडे, तुकाराम पावसकर, कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक अभिजित जाधव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.