जलतरण स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गाचा ठसा

जलतरण स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गाचा ठसा

Published on

85217

जलतरण स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गाचा ठसा
चिपळूणमधील स्पर्धाः लिनांशा नाईकला तीन सुवर्ण, उत्कर्षचेही यश
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १८ः चिपळूण येथील विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गनगरी येथील जलतरणपटू लिनांशा नाईक या चिमुकलीने सात वर्षांखालील गटात २५ मीटर फ्रीस्टाईल या प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. पन्नास मीटर फ्री स्टाईल प्रकारात प्रथम क्रमांक व ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. सोबतच ‘इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिप’ची मानकरी ठरली. या स्पर्धेत उत्कर्ष निवतकर याने अकरा वर्षे वयोगटात उल्लेखनीय कामगिरी केली.
महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने उमेश सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य विभागीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा शुक्रवारी (ता. १५) चिपळूण नगरपालिकेच्या रामतीर्थ जलतरण तलाव येथे पार पडली. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हे जिल्हे सहभागी होते. स्पर्धा १५ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडली. यात उत्कर्ष निवतकर याने अकरा वर्षे वयोगटाखालील स्पर्धेत २०० मीटर वैयक्तिक मिडलेमध्ये द्वितीय, ५० मीटर बटरफ्लायमध्ये द्वितीय व ५० मीटर फ्रीस्टाईल या प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला.
या दोन्ही स्पर्धकांना सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांचे मार्गदर्शन लाभले. ही दोन्ही चिमुकली या जलतरण तलावावर अनेक दिवसांपासून सराव करत आहेत. या दोन्ही स्पर्धकांचे जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, सहाय्यक सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com