कुडाळात २२ पासून युवा महोत्सव

कुडाळात २२ पासून युवा महोत्सव

Published on

swt१८२४.jpg
८५२२५
कुडाळः येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. डॉ. मंगेश जांबळे, स्मिता सुरवसे, प्रा. ठाकूर, प्रा. वालावलकर, प्रा. तुपेरे. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळात २२ पासून युवा महोत्सव
राऊळ महाविद्यालयात आयोजन ः जिल्ह्यातील ४२ महाविद्यालयांचा असणार समावेश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने ५८ वा युवा महोत्सव २२ व २३ ऑगस्टला संत राऊळ महाराज महविद्यालयात होत आहे. सिंधुदुर्ग विभाग अंतर्गत ४२ महाविद्यालये यात सहभागी होतील. या महोत्सवा अंतर्गत विविध अशा ३९ स्पर्धा होणार असल्याची माहिती संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे महोत्सव प्रमुख डॉ. मंगेश जांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विभाग अंतर्गत ५८ युवा महोत्सव येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे होत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, प्रा. रवींद्र ठाकूर, प्रा. संतोष वालावलकर, प्रा. मिलिंद तुपेरे, प्रा. सुहास पाटील आदी उपस्थित होते.
श्री. प्रा. जांबळे म्हणाले, ‘‘हा ५८ वा युवा महोत्सव असून याचे उद्घाटन २२ ला सकाळी साडेनऊ वाजता कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाठ, सरचिटणीस अनंत वैद्य, सहसचिव महेंद्र गवस यांच्यासह प्रमुख पाहुणे सांस्कृतिक विभाग मुंबई विद्यापीठ समन्वयक डॉ. निलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक, डॉ. नितीन वळंजू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा आमच्यासाठी सांस्कृतिक महोत्सव आहे. नियोजनाची जबाबदारी संत राऊळ महाराज महाविद्यालयावर असून यात ४२ महाविद्यालये सहभागी होणार आहेत.’’
शुक्रवारी (ता.२२) विविध स्पर्धांमध्ये पहिल्या दिवशी ३५ प्रकार होणार आहेत. यामध्ये भारतीय शास्त्र संगीत, नाट्य संगीत, तालवादक, तंतुवादक इतर वाद्य, पाश्चिमात संगीत, भारतीय पारंपरिक नृत्य लोककला वाड्मय विभाग वक्तृत्व मराठी, हिंदी, इंग्लिश वादविवाद स्पर्धा, अभिनय, कथाकथन स्पर्धा. २३ ला प्रश्नमंजुषा, थिएटर सेक्शन अंतर्गत एकांकिका स्पर्धा, नाटुकली, फाइन आर्ट ऑन दीस स्पॉट पेंटिंग, पोस्टल मेकिंग, शिल्पकाम ऐनवेळी विषय देऊन व्यंगचित्र, मेहंदी डिझाइन असे दोन दिवस ३९ स्पर्धा प्रकार होणार आहेत. ऑर्केस्ट्रा आणि कवाली हे डायरेक्ट मुंबई विद्यापीठात घेतले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com