वन, कबुलायतदार जमीन प्रश्न एकाचवेळी सुटणार

वन, कबुलायतदार जमीन प्रश्न एकाचवेळी सुटणार

Published on

85313

वन, कबुलायतदार जमीन प्रश्न एकाचवेळी सुटणार

दीपक केसरकर ः आंबोली, चौकुळ जमीन वाटप आताही शक्य

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः कबुलायतदार आणि वन या दोन्ही जमीनींचे वाटप एकाचवेळी व्हावे म्हणून हा प्रश्न रेंगाळला आहे; अन्यथा चौकुळ व आंबोलीवासीयांना कबुलायतदार जमिनीचे वाटप उद्याही करता आले असते‌. वन जमिनीतील वनखात्याच्या नोंदी रद्द करण्याची प्रक्रिया झाली असून त्याला शासनाची परवानगी आवश्यक आहे. लवकरच ती मिळणार असून वन आणि कबुलायदार दोन्ही जमिनींचे एकाच वेळी वाटप केले जाणार आहे, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेळे येथील कबुलायतदार जमीन वाटपावरुन भाजपच्या संदीप गावडे यांनी याचे श्रेय त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिले होते. शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी हे श्रेय केसरकरांचे असल्याचे म्हटले होते. यावरही केसरकर यांनी भाष्य केले.
श्री. केसरकर पुढे म्हणाले, ‘‘गेळे जमीन वाटप हे केवळ कबुलायतदार जमिनीचे आहे, ‘वन’चे नाही. त्यामुळे आंबोली, चौकुळवासीयांनी गैरसमज करू नये. वन जमिनींचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. त्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन्ही जमिनींचे एकत्र वाटप होईल. आंबोली, चौकुळ व गेळे ही सगळी गावं माझ्या घराप्रमाणे आहेत. त्यांना न्याय मिळावा हीच माझी भावना आहे. त्यामुळे वन प्रश्न मिटल्यावर तिन्ही गावांना जमीन वाटप होईल. येथील शेतकऱ्यांना पुढे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी माझा प्रयत्न आहे. वन खात्याची नोंद वगळण्याचा निर्णय झाला आहे. गेळेतून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्याने कबुलायतदार जमीन वाटपास थोडा वेळ लागला; अन्यथा चार महिन्यांपूर्वीच हे जमीन वाटप झाले असते. शासनाच्या वापराला आवश्यक जमीन सोडून उर्वरीत सर्व जमिनींचे वाटप ग्रामस्थांना केले जाणार आहे‌.
सरपंच, ग्रामस्थ सर्वांना विश्वासात घेऊनच हे काम होत आहे.’’ यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, सुरज परब आदी उपस्थित होते.
----
श्रेयासाठी काही जणांकडून ग्रामस्थांची दिशाभूल
आमदार केसरकर म्हणाले, यासंबंधीचे जीआर मी मंत्री असताना काढून घेतले आहेत. जीआर निघाले म्हणून जमीन वाटप होत आहे. मात्र, अध्यक्ष या नात्याने त्यांनी माझे नाव घेणे गरजेचे होते. मात्र, श्रेयवादासाठी कोणी घेतले नसेल तर त्याचे वाईट वाटत नाही. मात्र, ही कोकणची संस्कृतीही नाही. कबुलायतदार गावकर समितीचा अध्यक्ष या नात्याने संमती दिली म्हणूनच गेळे गावातील कबुलायतदार जमिनीचे वाटप होऊ शकले. केवळ श्रेय लाटण्यासाठी काहीजण ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत. गेळेतील सर्व ग्रामस्थ माझ्या घरातले आहेत. मी मतांसाठी कधी राजकारण केले नाही.’’
--------------
‘मल्टिस्पेशालिटी’ होणारच
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न हा राजघराण्याच्या स्वाक्षरींसाठी रखडला आहे. स्वाक्षरी झाल्या की या ठिकाणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे. आवश्यक लॅब, रक्तपेढी उपजिल्हा रुग्णालयात असल्याने त्याच ठिकाणी मल्टिस्पेशालिटी व्हावं. ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, बसस्थानकाच्या जवळ असावे यासाठी रूग्णालय परिसरात ते होण आवश्यक आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात आणखीन चांगल्या सुविधा देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे, अशीही माहिती आमदार केसरकर यांनी यावेळी दिली.
--------------
गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुरक्षित बनवू
गणेशोत्सवापूर्वी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कडेने असलेली झाडी तोडून रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत आणि सुरक्षित करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. मात्र, काही लोक या ठिकाणी वातावरण बिघडण्याच्या दृष्टीने आंदोलन करत आहेत. त्यांनी तसा प्रयत्न करू नये. सिंधुदुर्गात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मात्र, ते खड्डे बुजवून निश्चितच रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात येणार आहेत, असेही केसरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com