गणेश कार्यशाळांमध्ये कारागिरांची लगबग
(येई गणेशा लोगो)
-rat१८p२६.jpg-
२५N८५२५३
राजापूर ः श्री स्वामी समर्थांच्या वेशभूषेतील गणेशमूर्ती.
-rat१८p२८.jpg ः
२५N८५२५५
कापडी फेटेधारी गणेशमूर्ती.
---
गणेश कार्यशाळांमध्ये कारागिरांची लगबग
लालबागच्या राजाच्या मूर्तीला मागणी; चाकरमान्यांना वेध
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः अवघ्या पंधरा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, बाप्पाच्या स्वागताची लगबग घरोघरी सुरू झाली आहे. गणेश कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात कारागीर व्यस्त आहेत. आकर्षक रंगसंगती आणि विविध प्रकारच्या गणेशमूर्तींना गणेशभक्तांकडून पसंती मिळत आहे.
गेल्या काही वर्षापासून ‘लालबागचा राजा’, श्री स्वामी समर्थ, श्री बालाजी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (छावा), राधा-कृष्ण यांची छबी अन् कापडी फेटा बांधलेला आणि वस्त्रालंकार असलेल्या गणेशमूर्तींना गणेशभक्तांकडून अधिक पसंती मिळत आहे. कोकणातील चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. मुंबईत नोकरी-व्यवसायासाठी असलेले चाकरमानीही गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे गावातील बंद घरे खुली झाली आहेत. घरांमध्ये साफसफाई सुरू झालेली आहे. गणेशमूर्ती बनवण्यासाठी चित्रांची निवडही करण्यात आली आहे. चित्रशाळांमध्ये सव्वाफुटापासून चार-साडेचार-पाच फुटापर्यंतच्या गणेशमूर्ती बनवण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘लालबागचा राजा’ला गणेशभक्तांची पसंती आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या इतिहासाची नेहमीच चर्चा राहिली आहे. त्यांच्या छबीची प्रतिकृतीही या वेळी गणेशमूर्तींमध्ये उमटत आहे.
गणेशमूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या शाडूच्या मातीसह कारागिरांची मजुरी, वाहतूक खर्च आदींच्या दरामध्ये यावर्षी कमालीची वाढ झाली आहे. गणेशमूर्तींना काढण्यात येणाऱ्या रंगांच्या दरांमध्येही कमालीची वाढ झालेली आहे. त्यामुळे यावर्षी गणेशभक्तांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागणार आहे.
---
चौकट १
गणेशमूर्तींचे दर
सव्वाफूट मूर्ती ः १४०० रुपये
दीड फूट मूर्ती ः ः१८०० रु.
दोन फूट मूर्ती ः २५०० रु.
अडीच फूट मूर्ती ः ३५०० रु.
तीन फूट मूर्ती ः ५ हजार रु.
साडेतीन फूट मूर्ती ः ७५०० रु.
----
कोट
''लालबागचा राजा’ला गणेशभक्तांकडून नेहमीच पसंती मिळत आहे. भाविकांच्या पसंतीप्रमाणे गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देत आहोत.
- अनंत आडविलकर, गणेश मूर्तिकार