दापोलीत गोपाळकाला उत्साहात

दापोलीत गोपाळकाला उत्साहात

Published on

85272

तिडेच्या माजी सरपंच खैरेंचा गौरव
मंडणगड ः नालंदा ऑर्गनाझेशन या संस्थेच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या ग्रामसमृद्धी पुरस्कार सोहळा या कार्यक्रमात तिडे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुषमा खैरे यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खैरे यांचा शिवसेना मंडणगडच्या वतीने देव्हारे येथे दहीहंडी उत्सवाच्यानिमित्ताने झालेल्या जाहीर कार्यक्रमात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, उपतालुकाप्रमुख संजीव येसावरे, माजी जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, विभागप्रमुख संजय शेडगे, दीपक मालुसरे आदी उपस्थित होते.

दापोलीत गोपाळकाला उत्साहात
दापोली ः शहरातील गोकुळाष्टमीनिमित्त शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने दहीहंडी उत्सव उत्साहात झाला. सोहळ्याला गृह राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते. या सोहळ्यात तब्बल ३२ गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला. मुंबईत नावलौकिक मिळवलेल्या ''हिंदुराज गोविंदा पथका''ने पुन्हा एकदा दापोलीत ८ थरांची सलामी दिली.

आंबडसमध्ये वृक्षारोपण
चिपळूण ः खेड तालुक्यातील आंबडस पेठच्या संघर्ष मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. आंबडस ते धामणद रोडच्या बाजूने काडवली, कुंभवली ग्रामपंचायत आणि केळणे ग्रामपंचायत हद्दीत झाडे लावण्यात आली. यावेळी संघर्ष मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव कदम, रवींद्र सागवेकर, नीलेश कदम, सचिन महाडिक, रमेश चव्हाण, शरद कदम, संदीप आंब्रे तसेच काडवलीचे सदानंद राळे, अमित पड्याळ, विकास गजमल आदी उपस्थित होते.

पारंपरिक चित्ररथ
मिरवणुकीचे आयोजन
चिपळूण : गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त वैश्य वसाहत येथील श्रीदेव मुरलीधर देवस्थान येथे पारंपरिक चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत भक्त पुंडलिकाची कथा सादर करून उपस्थित भक्तांना भक्‍तिभावाचा अनुभव देण्यात आला. याप्रसंगी कलाकारांमध्ये श्रीकृष्णाची भूमिका वैभव गुढेकर, पुंडलिकाची भूमिका राकेश कोलगे, तर आई-वडिलांची भूमिका श्री. व सौ. प्रज्ञा गुढेकर यांनी साकारली. रंगभूषा रामनाथ (बापू) आवले यांनी केली. चित्ररथ मिरवणुकीमुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला.

Marathi News Esakal
www.esakal.com