मुसळधारेने कणकवलीत जनजीवन विस्कळीत

मुसळधारेने कणकवलीत जनजीवन विस्कळीत

Published on

85206
वरवडे ः येथील आचरा मार्गावर पुराचे पाणी आल्‍याने सकाळपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.

85207
कणकवली ः मुसळधार पावसामुळे जानवली नदीपात्रात पूरस्थिती होती.


मुसळधारेने कणकवलीत जनजीवन विस्कळीत

‘गड’, ‘जानवली’ला पूर; आचरा मार्गावरील वाहतूक ठप्प, काही ठिकाणी पडझड

कणकवली, ता. १८ ः गेले दोन दिवस सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्‍यात पूरस्थिती असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडनदीचे पाणी आल्‍याने आज सकाळी दहा वाजेपर्यंत कणकवली आचरा मार्गावरील वाहतूक ठप्प होती. तर गड आणि जानवली नद्यांमध्ये पूरस्थिती होती. सकाळी अकरा नंतर पाऊस थांबला त्‍यामुळे पूर क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला.
कणकवली शहर तसेच तालुक्‍यात काल (ता.१७) दिवसभ संततधार सुरू होती. तर रात्रीही जोरदार पाऊस झाला. यात कणकवली आचरा मार्गावर वरवडे येथे पुराचे पाणी आल्‍याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. येथील वाहतूक बिडवाडी मार्गे वळविण्यात आली. सकाळी दहा नंतर पूराचे पाणी ओसरले. त्‍यानंतर आचरा मार्गावरील वाहतूक पूवर्वत झाली.
मुसळधार पावसामुळे आशिये गावातील खालचीवाडी भागात पाणी घुसल्‍याने येथील नागरिकांची धावपळ उडाली होती. पावसाचा जोर कायम राहिला असता तर येथील सुमारे ३५ घरांचा संपर्क तुटण्याची भीती होती. सकाळच्या सत्रात कणकवली सातरल तसेच शिवडाव-राऊळवाडी येथील पुलावरून पाणी जात असल्‍याने येथील वाहतूक काही काळ ठप्प राहिली होती. सकाळी दहा नंतर पावसाचा जोर कमी झाला. त्‍यामुळे तालुक्‍यातील पूरस्थिती हळूहळू ओसरली आणि नागरिकांनाही दिलासा मिळाला.
---
85352

सावंतवाडी येथे घराची भिंत
कोसळून दीड लाखांची हानी

सावंतवाडी, ता. १८ ः गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील चितारआळी भागात बंद घराची भिंत कोसळून नुकसान झाले. ही घटना रविवारी (ता. १७) घडली. सुनंदा बांदेकर व माई बांदेकर यांचे हे बंद घर असून मुसळधार पावसाचा फटका याला बसला. यात सुमारे दीड लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
​तालुक्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून किरकोळ पडझडीच्या घटना घडत आहेत. बांदेकर यांच्या घराची एक बाजू पूर्णपणे कोसळल्याने घरातील सामानाचेही मोठे नुकसान झाले. या कोसळलेल्या भिंतीमुळे लगतच्या हळदणकर यांच्या घराचे देखील किरकोळ नुकसान झाले. ​घराची पडझड झाली असली तरी सुदैवाने घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र आता हे कोसळलेले घर इतर घरांसाठी धोकादायक बनले आहे. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी शहर तलाठी आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. प्रशासनाकडून तातडीने पुढील कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com