पर्यटन कॉटेजससाठी ४५ लाभार्थी निश्चित
85397
पर्यटन कॉटेजससाठी ४५ लाभार्थी निश्चित
आमदार दीपक केसरकर ः ‘सिंधुरत्न’मधून मदत, जिल्ह्याच्या विकासाला गती येणार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १८ ः सिंधुरत्न योजनेतून दोन ते तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजस उभी राहणार आहेत. या प्रकल्पासाठी १५ कोटींची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात ४५ लाभार्थी निश्चित झाले असून यातून जिल्ह्याच्या पर्यटनाला गती येणार असल्याचे प्रतिपादन सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी केले.
सिंधुरत्न समृद्ध योजनेतून आंततरराष्ट्रीय दर्जाच्या कॉटेजस उभारणीसाठी देण्यात येणाऱ्या कर्जतिरणाचा कार्यक्रम अध्यक्ष केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडला. यावेळी ४५ लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले असून त्यातील ४ लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्ज मंजुरीचा धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा नियेाजन अधिकारी यशवंत बुधावले, तत्कालीन उपमुख्य कार्यकारी विशाल तनपुरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक विठ्ठल देसाई, महेश सारंग, मोहन सावंत, कॉटेज उभारणीचे काम घेतलेल्या कंपनीचे ओमकार कलावडे आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर पुढे म्हणाले, ‘‘सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्नात वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारण्यासाठी या योजनेतून १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी टाईप ए प्रकारामध्ये ३० लाख रुपये आणि टाईप बी प्रकारात ४० लाख रुपये असे दोन प्रकारचे कॉटेजेस उभारण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांना प्रकल्पाच्या ५० टक्के अनुदान अदा केले जाणार आहे. या प्रकल्पात लाभार्थ्यांची गुंतवणूक रक्कम जास्त असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनेक योजनांना नेहमीच सहकार्य लाभले आहे. हे कॉटेज पूर्ण झाल्यावर ‘ताज ग्रुप’चे सहकार्य घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याने लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.’’
मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर म्हणाले, ‘‘सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देणाऱ्या अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. परिणामी आपल्या जिल्ह्याच्या पर्यटनाचा वेग वाढत आहे. आंतराष्ट्रीय दर्जाचे कॉटेजस पूर्ण झाल्यावर नक्कीच पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. जिल्ह्याच्या विकासात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे देखील मोलाचे योगदान आहे. भविष्यात जिल्हा परीषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँक एकत्रितपणे अनेक योजना राबविणार आहेत.’’
-------------------
पर्यटक वाढीबरोबरच रोजगाराच्या संधी
जिल्हा बँकेचे अध्यक्ष दळवी यांनी, सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारण्याचा निर्णय हे जिल्ह्याच्या विकासात ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. आता आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने पर्यटनवाढीसह रोजगाराच्या संधीत देखील वाढ होणार आहे. पर्यटनवाढीमध्ये आता स्थानिकांचा सहभाग वाढणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ महिन्यांत ४५ ठिकाणी १५० खोल्या उभारण्यात येणार असल्याने खऱ्या अर्थाने हा प्रकल्प पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प ठरणार आहे. तसेच उच्च दर्जाचे पर्यटक जिल्ह्यात फिरायला यायचे. परंतु, वस्तीसाठी गोवा राज्यात जात होते. कारण त्यांना अपेक्षित दर्जाच्या निवासी व्यवस्था उपलब्ध नव्हत्या. मात्र, आता ही कॉटेजेस झाल्यावर जिल्ह्यात केवळ फिरायला येणारे पर्यटक जिल्ह्यातच निवास करतील, असा विश्वास व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.