
85508
तेली समाजातील
गुणवंतांचा गौरव
लांजा ः लांजा तालुका तेली समाजसेवा संघ व लांजा तालुका युवा तेली समाजसेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव करण्यात आला. या वेळी रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघाचे कार्याध्यक्ष दीपक राऊत, तालुकाध्यक्ष प्रकाश लांजेकर, विठोबा लांजेकर, रत्नागिरी तेली समाजाचे सहचिटणीस संदीप पवार, महिला अध्यक्ष कल्पना लांजेकर आदी उपस्थित होते. शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी, बारावी आणि इतर क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांचा सन्मानचिन्ह, गौरवपत्र, वही, पेन, शाल, श्रीफळ देऊन गुणगौरव झाला.
प्रकाश निवळकर
अध्यक्षपदी
चिपळूण ः येथील संत गोरा कुंभार विकास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश निवळकर यांची तर कार्याध्यक्षपदी रवी साळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खेर्डी येथील श्री संत शिरोमणी गोरोबाकाका सभागृहात मंडळाच्या झालेल्या बैठकीत या पदाधिकाऱ्यासह नवीन संचालकांची निवड करण्यात आली. बैठकीत सर्वानुमते नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आल्या. त्यानुसार रवींद्र साळवी (कार्याध्यक्ष), अमोल पिरदनकर (उपाध्यक्ष), दीपक शिरकर (उपाध्यक्ष), प्रकाश कराडकर (सचिव), लक्ष्मण गुडेकर (खजिनदार), पांडुरंग कुंभार (सहखजिनदार), अरविंद गुडेकर (सहसचिव) यांच्यासह प्रकाश साळवी, दीपक साळवी, किशोर साळवी, रमेश कलमकर, अरविंद पडवेकर, हरिश्चंद्र पडवेकर, अनंत गुडेकर, रघुनाथ कुंभार, सुनील कुंभार, अशोक निवळकर, मनोहर बुरबाडकर, सुनील पडवेकर, विजय भैरवकर आदी संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली.
साडवली उपसरपंचपदी
प्राची जाधव
साडवली : संगमेश्वर तालुक्यातील साडवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्राची जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवडीच्या घोषणेनंतर रोहन बने, नेहा माने, साडवलीचे सरपंच संतोष जाधव, ग्रामपंचायत सदस्य, साडवलीतील ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.