शहर उध्वस्त करणारा आराखडा रद्द करा

शहर उध्वस्त करणारा आराखडा रद्द करा

Published on

85641


शहर उद्ध्वस्त करणारा आराखडा रद्द करा

वैभववाडीतील सभेत मागणी; कोणालाच विश्वासात घेतले नसल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १९ ः शहराचा विकास आराखडा तयार करताना नगरपंचायत पदाधिकारी, नागरिक यापैकी कुणालाही विश्वासात घेण्यात आलेले नाही. परिणामी चुकीच्या पद्धतीने आराखडा तयार केला आहे. शहर उद्ध्वस्त करणारा आराखडा आम्ही कदापी स्विकारणार नाही. त्यामुळे तो रद्द करून नव्याने करावा, असा ठराव आज घेण्यात आला.
येथील वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची विशेष सभा नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला नगरविकास प्रधिकरणच्या सहाय्यक संचालक स्मिता कलगुटगी यांना निमंत्रित करण्यात आले होते. या सभेला उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, बांधकाम सभापती रणजित तावडे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, सानिका रावराणे, दर्शना पवार, रोहन रावराणे, नेहा रावराणे, संजय सावंत, विवेक रावराणे, सुभाष रावराणे, राजन तांबे, सुंदराबाई निकम, संगीता चव्हाण आदी उपस्थित होते.
वैभववाडी शहराचा विकास करताना नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक, शेतकरी, व्यापारी यापैकी कोणत्या घटकाला विश्वासात घेतले आहे का? असा प्रश्न नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरविकास प्रधिकरणच्या सहाय्यक संचालकांना उपस्थित केला. नगरसेवक सावंत यांनी तीन वर्ष ही प्रकिया सुरू आहे. मात्र, त्याची पुसटशी कल्पनाही नगरपंचायतीला दिली नाही. त्यामुळे या सर्व प्रकियेबद्दल अनभिज्ञ आहोत आणि त्यामुळे जनतेलाही काहीही माहीती नाही. आम्हाला विकास हवाय परंतु शहराचा भकास करायचा नाही, असे सांगितले. श्रीमती कळगुटगी यांनी विकास आराखडा तयार करण्याची प्रकिया ही पूर्णपणे गोपनीयपणे राबविली जाते. कुणालाही विश्वासात घेणे किंवा नागरिकांना कल्पना देणे अशा प्रकारची तरतुदच या प्रकियेत नाही. परंतु, तयार करण्यात आलेल्या आराखड्यावर आपल्या सर्वांना सुचना, हरकती नोंदविता येतील त्यानुसार काही बदल होतील. परंतु, ते अधिकार नियोजन समितीला आहेत, असे स्पष्ट केले. मात्र, तरीही सदस्य आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. अनेकाच्या घरांवर आरक्षण पडले आहे. काही इंदिरा आवास घरकुलांच्या मधून रस्ते आहेत. ती घरे कोसळायची का० असा प्रश्न देखील सदस्यांनी उपस्थित केले. अशा प्रकारचा आराखडा आम्ही कदापि स्विकारणार नाही. तो रद्दच करण्यात यावा, असा ठरावा सभेत घेण्यात आला.
------------
...अन्यथा आम्ही राजीनामा देतो
नगरविकासने तयार केलेला वैभववाडी शहराचा विकास आराखडा आम्हाला मान्य नाही. तुमच्या चुकांमध्ये लोकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तो रद्दच करावा; अन्यथा आम्ही आमच्या पदांचा राजीनामा देतो, असे मत उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे आणि बांधकाम सभापती रणजित तावडे यांनी व्यक्त केले.
-------------
सरकारी जमीन का वगळली?
वैभववाडी शहरात २०० गुंठे जमीन सरकारी आहे. ती विकास आराखडा तयार करताना वगळली आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतजमीन आरक्षित केल्याचा आरोप नगरसेवक विवेक रावराणे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com