हातिसच्या कल्पवृक्षाचा वाढदिवस
rat२०p५.jpg-
२५N८५७३४
रत्नागिरी : हातिस येथे कल्पवृक्षाच्या वाढदिनी नवीन नारळाचे रोप लावून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी डॉ. किशोर सुखटणकर, अॅड. संध्या सुखटणकर, डॉ. दिलीप नागवेकर आदी.
---
हातिसमध्ये कल्पवृक्षाचा वाढदिवस
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : तालुक्यातील हातीस गावात ग्रामस्थांनी लावलेल्या कल्पवृक्षाचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
रत्नागिरीपासून १८ कि.मी. अंतरावर काजळी नदीच्या काठावरील हातिस या छोट्याशा गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ग्रामदेवता भैरी-जुगाई मंदिर परिसरात कल्पवृक्षाचे (नारळाचे) एक झाड लावून स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ग्रामस्थांनी नारळाची ७५ रोपे लावून स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. यंदा देखील उत्साहात कल्पवृक्षाचा वाढदिवस साजरा केला. पीर बाबरशेख बाबांचे मंदिर परिसरात कल्पवृक्षाचे रोप माजी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, ॲड. संध्या सुखटणकर आणि हातिस ग्रामस्थांच्या हस्ते लावण्यात आले. त्या वेळी डॉ. दिलीप नागवेकर यांनी कल्पवृक्षाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. या प्रसंगी डॉ. दिलीप नागवेकर, विजय नागवेकर, जयवंत नागवेकर, दिवाकर नागवेकर, राजेंद्र नागवेकर, ॲड. तुषार नागवेकर, कांचन नागवेकर, अनुराधा निवंडीकर, राधिका नागवेकर, देवीप्रसाद (बंड्या) नागवेकर, नीता नागवेकर, दीपक आंबुलकर उपस्थित होते.