कथ्थकमध्ये डीबीजेच्या प्राध्यापिकांना प्रथम क्रमांक
- rat२०p१२.jpg-
P२५N८५७५१
चिपळूण ः नागपूर राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत कथ्थक नृत्यप्रकारात प्रथम क्रमांक पटकावलेले डीबीजे महाविद्यालयातील प्राध्यापिका.
कथ्थकमध्ये डीबीजेच्या प्राध्यापिकांचे यश
कला संमेलन ; देशभरातील ८०० स्पर्धकांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ : नागपूर येथे आयोजित कला संमेलन २०२५ या राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयाच्या प्राध्यापिकांनी कथ्थक नृत्यप्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत देशभरातील सुमारे ८०० स्पर्धक सहभागी झाले होते.
खुल्या गटातून स्पर्धेत उतरलेल्या प्रा. डॉ. निलम शिंदे, प्रा. कांचन तटकरे, प्रा. शुभांगी कदम, प्रा. तृप्ती यादव, प्रा. अंकिता रेडीज आणि प्रा. सिद्धी साडविलकर यांनी समूह कथ्थक सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधले आणि प्रथम पारितोषिकाचा मान मिळवला. या प्राध्यापिकांना नृत्य गुरू, नृत्यालंकार स्कंधा चितळे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कौशल्य सिंधूतील नृत्यवर्गाच्या समन्वयक प्रा. सोनाली खर्चे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाविद्यालयीन कामकाज आणि घरगुती जबाबदाऱ्या सांभाळून या प्राध्यापिकांनी कठोर मेहनत, सातत्यपूर्ण रियाज आणि परस्पर समन्वय साधत हे यश मिळवले. या कामगिरीबद्दल न. ए. सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, डॉ. माधव बापट, अनिल कलकुटकी, डॉ. दीपक विखारे, प्रकाश जोशी, अतुल चितळे, अविनाश जोशी, संजीव खरे यांनी अभिनंदन केले.