-....तर रक्तक्षयाचे प्रमाण निश्चितच कमी होईल !
- rat२०p२८.jpg-
P२५N८५७९८
रत्नागिरी ः तालुकास्तरीय अॅनिमिया नियंत्रण प्रकल्प उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वैदेही रानडे.
...तर रक्तक्षयाचे प्रमाण कमी होईल !
वैदेही रानडे ः तालुकास्तरीय अॅनिमिया नियंत्रण प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः प्रत्येकाने आपल्या परसबागेतून लोहयुक्त हिरव्या भाज्यांचा समावेश आहारात केला तर रक्तक्षयाचे प्रमाण निश्चितच कमी होईल. हा प्रकल्प आपल्या मनातील आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
जिल्ह्यातील महिला आणि बालकांमध्ये वाढत्या रक्तक्षयाच्या समस्येवर मात करण्यासाठी रत्नागिरीत आयोजित अॅनिमिया नियंत्रण प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. या उपक्रमाचे आयोजन श्रीमद् राजचंद्र हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरने (धरमपूर, जि. वलसाड, गुजरात) आणि स्वयंपूर्तता फाउंडेशन यांच्यावतीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, श्रीमद् राजचंद्र हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरचे प्रकल्प संचालक विरेन गांधी, स्वयंपूर्तता फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपिका रांबाडे, सचिव युयुत्सू आर्ते आदी उपस्थित होते. या प्रसंगी जिल्ह्यातील उपस्थित महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. कमी हिमोग्लोबिन असलेल्या महिलांना औषधोपचार आणि आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. या वेळी आठल्ये म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण जास्त असून, या प्रकल्पामुळे महिलांना आणि मुलांना मोठा फायदा होईल तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव यांनी रक्तक्षयावरील माहिती आणि त्यावरील उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
चौकट
असा आहे कार्यक्रम
अॅनिमिया नियंत्रण प्रकल्पामध्ये महिला व बालकांमधील अॅनिमिया कमी करण्यासाठी जनजागृती करणे, आरोग्य तपासणी, लोहयुक्त आहाराबाबत मार्गदर्शन आणि औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.