शहरातील रस्त्यांची सोशल मीडियावर खिल्ली
rat२१p५.jpg-
२५N८६०१३
रत्नागिरी ः शहरातील भूतेनाका येथे काँक्रिटच्या रस्त्याला जोडण्यासाठी टाकलेला भराव वाहून गेल्याने पडलेला खड्डा.
rat२१p६.jpg-
२५N८६०१४
पटवर्धन हायस्कूलसमोर खड्ड्यात गेलेला रस्ता.
rat२१p७.jpg-
P२५N८६०१५
मे महिन्यात डांबरीकरणाचा टाकलेला लेअर वाहून जाऊन मूळ रस्ता दिसू लागला आहे.
rat२१p९.jpg-
P२५N८६०१७
राममंदिरासमोरील रस्त्यावर डांबरच शिल्लक राहिलेले नाही.
rat२१p१०.jpg-
२५N८६०२७
जयस्तंभ येथे पडलेल्या मोठ्या खड्ड्यात भरलेली डबर.
rat२१p११.jpg-
२५N८६०२८
गोगटे कॉलेज मार्गावर विद्यार्थी खड्ड्यातून प्रवास करत आहेत.
rat२१p१२.jpg-
२५N८६०२९
एलआयसी ऑफिस, बॅंक ऑफ महाराष्ट्र या रस्त्यावर गेली अनेक वर्षे खड्डे जैसे थे आहेत.
rat२१p१३.jpg-
२५N८६०३०
काँग्रेस भुवन नाक्यावर खड्डे चुकवताना वाहनचालक.
rat२१p१४.jpg-
२५N८६०३१
शहरात खड्ड्यांमध्ये खडी टाकून बुजवण्याचे काम सुरू झाले.
---
( ग्राफीक पद्धतीने घ्यावे.)
शहरातील रस्त्यांची सोशल मीडियावर खिल्ली
पालिका, लोकप्रतिनिधीनी तातडीने लक्ष घालण्याची गरज ; वाहनचालक, पादचारी हैराण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : ‘रत्नागिरीकरांनो, तुमच्या सहनशीलतेला सलाम’ या मथळ्यावर रत्नागिरी शहरातील खड्ड्यांमध्ये गेलेल्या रस्त्यांवर काही नागरिकांनी सोशल मीडियावर उपहासात्मक टीपण्णी करून पालिका आणि लोकप्रतिनिधींना कोपरखळी हाणली आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्थाच एवढी वाईट झाली आहे की, एकही रस्ता चांगला राहिलेला नाही. सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून जाताना नागरिक, वाहनधारक अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहत आहेत, एवढा संताप आहे. मलमपट्टी बंद करून पालिकेने गणेशोत्सवाच्या आधी हे खड्डे काँक्रिटने भरावेत, अशी जनतेची मागणी आहे.
शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेने नागरिकांच्या नाकीनऊ आणले आहे. शहरातील अंतर्गत प्रमुख रस्त्यांची झालेली दुरवस्था, त्यावर साचलेली खडी, उखडलेले डांबरीकरण आणि पावसामुळे रुंदावलेले खड्डे या सर्व परिस्थितीमुळे रत्नागिरीतील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. मारुती मंदिर, जयस्तंभ, मारुती आळी, रामआळी तसेच माळनाका ते सिव्हिल हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, भुतेनाका, काँग्रेस भवन, लक्ष्मीचौक आदी मार्गावरील रस्त्यांची अवस्था इतकी खराब आहे की, दुचाकी वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सध्या या रस्त्यांवर खडी, दगड वर आले आहेत. कोणत्याही क्षणी अपघात होण्याचा धोका असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.
मे महिन्यात रस्त्यांचे डांबरीकरण झाले; पण ते किती टिकले? आता या रस्त्यावरून जाताना वाटते की, पुन्हा पूर्वीचे रस्तेच बरे होते, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत. शहरात सध्या सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामालाही तात्पुरता ब्रेक लागला आहे. पावसानंतर ते सुरू होण्याची शक्यता आहे; परंतु तोंडावर गणेशोत्सव आहे. त्यापूर्वी तरी शहरातील खड्ड्यात गेलेले रस्ते पालिकेने सुस्थितीत करावे, अशी मागणी नागरिक आणि गणेशभक्तांची आहे. नागरिकांचे सत्ताधाऱ्यांना साकडे आहे की, त्यांनी प्रत्यक्ष या रस्त्यांवरून चालत फेरफटका मारावा आणि सामान्य नागरिकांना कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, हे स्वतः अनुभवावे. नगरपालिकेने या खड्ड्यांमध्ये फक्त जांभ्या दगडांची भर घालून थातूरमातूर काम न करता काँक्रीटद्वारे रस्त्यांचे सुयोग्य आणि टिकाऊ पुनर्बांधणी करावी, अशी मागणी होत आहे.
---
चौकट
पावसाचे कारण, दर्जाबाबत मौन
दरवर्षी पालिका आणि लोकप्रतिनिधी अतिवृष्टीचे कारण पुढे करतात. मग अतिवृष्टी लक्षात घेऊन रस्ते का होत नाहीत? पांगरी-देवरूख मार्गाचे काम करून पाच वर्षे झाले अजून त्याला एवढ्या पावसांमध्ये खड्डे नाहीत. मग रत्नागिरी शहरातील रस्ते मे महिन्यात करून देखील पावसात दोन महिन्यात का वाहून जातात? दरवर्षी दर्जाहीन रस्त्यांचीच कामे करून नागरिकांचा पैसा वाया घालवायचा का, अशी संतप्त प्रतिक्रिया आहे.
चौकट
संतापाचा सूर
सध्या सोशल मीडियावर अनेक नागरिक आपल्या अनुभवांचा सूर जाहीरपणे मांडू लागले आहेत. एकीकडे रत्नागिरीसारख्या ऐतिहासिक व पर्यटकप्रिय शहराची अशी दुरवस्था बघून मनस्ताप होतो तर दुसरीकडे नागरी सहनशीलतेचा चमत्कारिक धीरही जाणवतो; पण हा धीर किती दिवस टिकणार? शासन आणि प्रशासनाने आता तरी या मागण्यांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
कोट...
शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय परिस्थिती झाली आहे. आमच्या आयुष्यात खड्डे पाहिले नाहीत तेवढे खड्डे आम्ही रत्नागिरीत पाहिले. एखादा वयोवृद्ध या रस्त्यावरून दुचाकी कशी चालवणार? शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी जयस्तंभ येथून रोज जातात, त्यांना खड्डे दिसत नाहीत का? मग शहरातील अंतर्गत खड्डे ते कसे पाहणार? रोड कर वसूल करता ना मग आम्हाला अशा रस्त्यावरून जाऊन आमच्या आणि प्रवाशांचे मणके मोडत आहेत. आम्हाला भरपाई द्या, अशी मागणी मी आरटीओकडे केली आहे.
-प्रताप भाटकर, अध्यक्ष, रत्नदुर्ग रिक्षा संघटना
कोट
रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच रस्त्यांची एवढी दयनीय अवस्था झाली आहे. एका वर्षात शहरातील रस्त्यावर २-३ वेळा डांबर टाकून टाकूनही रस्ते एक पावसाळा पण टिकत नसतील तर यासारखे दुर्दैव नाही. त्यावर कहर म्हणून करोडो रुपये आधीच डांबरी रस्त्यावर खर्ची झाले असताना इतर निधी वर्ग करून काँक्रिटीकरण करण्यात आले. त्याचाही दर्जा तुम्हाला काही दिवसात दिसेल. आम्ही विरोधी पक्ष म्हणून कायम आंदोलन करतो; पण आता जनतेने रस्त्यावर उतरण्याची खरी गरज आहे.
-प्रसाद सावंत, शहर संघटक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
कोट
पावसाची उघडीप आज मिळाली आहे. आजपासूनच खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी पेव्हरब्लॉक टाकले आहेत. अनेक ठिकाणी आरएमसी टाकून खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांना पत्र दिले असून, रात्री शहरातील खड्डे भरून घेतले जातील. गरज भासल्यास काही ठिकाणी डांबरीकरणाचा एक लेअर टाकला जाईल. गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल.
-वैभव गारवे, मुख्याधिकारी रत्नागिरी पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.